पालकमंत्र्यांकडून नुकसानग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:50+5:302021-09-12T04:15:50+5:30
चांदूर रेल्वे-मांजरखेड : तालुक्यातील पळसखेड, राजुरा, पाळा, धानोरा म्हाली, मांजरखेड कसबा या गावांच्या शिवारात झालेल्या शेती व घरांच्या नुकसानाची ...
चांदूर रेल्वे-मांजरखेड : तालुक्यातील पळसखेड, राजुरा, पाळा, धानोरा म्हाली, मांजरखेड कसबा या गावांच्या शिवारात झालेल्या शेती व घरांच्या नुकसानाची पाहणी शनिवारी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. यावेळी मांजरखेड येथील शौकत पठाण व इतरांना नुकसानभरपाईसाठी ना. ठाकूर यांनी मदतीचा धनादेश दिला.माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या आवाहनावरून ना. यशोमती ठाकूर यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. राजुरा, पाळा, पळसखेड, धानोरा म्हाली, मांजरखेड कसबा शिवारात प्रत्यक्ष जाऊन शेतातील प्रत्यक्ष नुकसानाची व घरांच्या पडझडीची माहिती तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर चांदूर रेल्वे येथिल विश्रामगृहात महसूल, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, वन, पंचायत समिती, कृषी अधिकारी यांना नुकसानाचे अहवाल करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवावे, असे आदेश त्यांनी दिले. याबाबतीत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी बाधित झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्याची समस्या व्यक्त केल्या. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश निमकर, सदस्य नितीन गोंडणे, पंचायत समिती सदस्य अमोल होले, सरपंच दिलीप गुल्हाने व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.