व्यावसायिकाच्या घरावर सहायक निबंधकांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:52 AM2019-08-29T00:52:25+5:302019-08-29T00:53:48+5:30

सहायक निबंधक अ.श.उल्हे यांच्याकडे परतवाडा शहरातील किसन शर्मा नामक व्यावसायिक भिशीच्या नावावर अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार दाखल झाली. या अनुषंगाने त्यांनी कार्यालयातील दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साह्याने श्याम टॉकीजलगत गुजरीबाजार स्थित त्या पोलीस बंदोबस्तात व्यावसायिकाच्या घराची झडती घेतली. किसन शर्मा यांच्यासह घरातील सदस्यांची त्यांनी चौकशी केली.

Assistant registrar's forays into the business house | व्यावसायिकाच्या घरावर सहायक निबंधकांची धाड

व्यावसायिकाच्या घरावर सहायक निबंधकांची धाड

Next
ठळक मुद्देदस्तऐवज जप्त : अवैध सावकारीची तक्रार

अमरावती : अचलपूर सहायक निबंधकाच्या पथकाने मंगळवारी येथील अवैध सावकाराच्या घरी धाड घातली. यामध्ये अनेक नियमबाह्य दस्तऐवज जप्त करण्यात आले.
सहायक निबंधक अ.श.उल्हे यांच्याकडे परतवाडा शहरातील किसन शर्मा नामक व्यावसायिक भिशीच्या नावावर अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार दाखल झाली. या अनुषंगाने त्यांनी कार्यालयातील दहा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या साह्याने श्याम टॉकीजलगत गुजरीबाजार स्थित त्या पोलीस बंदोबस्तात व्यावसायिकाच्या घराची झडती घेतली. किसन शर्मा यांच्यासह घरातील सदस्यांची त्यांनी चौकशी केली. तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेतली. चौकशी आटोपताच त्यांच्याकडे असलेले दस्तावेज पथकाने जप्त केले. नेमकी तक्रार काय, जप्त केलेल्या दस्तावेजात काय दडले आहे, याविषयी एआर कार्यालय कमालीची गोपनीयता बाळगून आहे. एआर उल्हे बुधवारी फोनवर उपलब्ध झाले नाहीत. किशन शर्मा यांनी काही दिवसांपूर्वीच सावकारी परवाना मिळविल्याची माहिती आहे.

 

Web Title: Assistant registrar's forays into the business house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.