यशोमती ठाकुरांच्या सहकार

By admin | Published: September 8, 2015 12:01 AM2015-09-08T00:01:15+5:302015-09-08T00:01:15+5:30

सहकारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे सर्वच १८ ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले.

Assistant to Yashomati Thakur | यशोमती ठाकुरांच्या सहकार

यशोमती ठाकुरांच्या सहकार

Next

पॅनेलचा दिमाखदार विजय
सर्वच १८ उमेदवार विजयी : तिवसा बाजार समितीत एकहाती सत्ता

रोशन कडू  तिवसा
सहकारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे सर्वच १८ ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. विरोधी शेतकरी कल्याण पॅनेलचा एकही उमेदवार विजयी होऊ न शकल्याने या निकालाची खमंग चर्चा सर्वत्र आहे. आ. ठाकूर यांच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकवटले होते, हे उल्लेखनीय.
सोमवारी सकाळी १० वाजता येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात मतमोजणीला सुरूवात झाली. सर्वप्रथम सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी झाली. यामध्ये बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक संजय वैकुंठराव वानखडे हे सर्वाधिक २५२ मते घेवून विजयी झाले. या सर्वसाधारण गटात गजानन अरविंदराव देशमुख (२४९), कमलाकर वाघ (२४७), मोहन चर्जन (२३९), सुखदेव दमाये (२३६), हरीभाऊ पाचघरे (२३०) व रणजीत राऊत (२२९) विजयी झाले. महीला राखीव गटात आशा श्रीकृष्ण राऊत (२५९), संगीता सुरेंद्र साबळे (२५२) विजयी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय गटात किशोर चौधरी (२५४), विमुक्त भटक्या जाती गटात दिनेश साव (२५८) विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात प्रदीप मधुकरराव बोके (१९६), विशाल सुभाषराव केने (१९६) हे उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात रामराव तांबेकर (२००), आर्थिक दुर्बल गटात प्रमोद धावडे (२०२), व्यापारी व अडते गटात गोपाल बिजवे (२८) व तुळशीराम भोयर (२०) हे उमेदवार विजयी झाले.

Web Title: Assistant to Yashomati Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.