संघटनेतील कार्यकर्त्यांना उमेदवारीची स्वप्ने !

By admin | Published: November 2, 2016 12:32 AM2016-11-02T00:32:44+5:302016-11-02T00:32:44+5:30

महापालिका निवडणूक आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

Association workers dreams of candidacy! | संघटनेतील कार्यकर्त्यांना उमेदवारीची स्वप्ने !

संघटनेतील कार्यकर्त्यांना उमेदवारीची स्वप्ने !

Next

महापालिका निवडणूक : भाजप, काँग्रेसकडे इच्छुकांचा कल
अमरावती : महापालिका निवडणूक आता तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आरक्षण सोडत व प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणुकीच्या घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, राजकीय पक्षात सक्षम, निवडून येणाऱ्या उमेदवारांचा शोध सुरू झाला आहे. या वातावरणात इच्छुकांची लगबग आणि हुरहुरही वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापासून निवडून येण्यापर्यंत कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात. परंतु ऐनवेळी होणाऱ्या पक्षांतरमुळे कार्यकर्त्यांना मिळणारी संधी हुकते आणि ते अस्वस्थ होतात. या पार्श्वभूमिवर आता उमेदवारी मिळविण्यापासूनच संघर्षात सुरूवात झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमधून काँग्रेसमध्ये येणाऱ्या अन् पक्ष तिकिटासाठी दावेदारी ठोकणाऱ्यांमुळे काँग्रेसमध्ये एका चिंतेची लकिर उमटली आहे. त्यामुळे पलिकडून येणाऱ्यांना तिकिटे मिळते की, आपल्याला? याची हुरहुर अनेक विद्यमानांसह इच्छुकांना लागून राहिली आहे.
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि अनेक कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात. पक्ष संघटनेत पक्ष मिळाल्यावर तो कार्यकर्ता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्याचे स्वप्न बघू लागतो. त्यासाठी आमदार, खासदारांसोबत पालकमंत्री व इतर मंत्र्यांचे कार्यक्रमाचे आयोजन करतो. पक्ष संघटनेचा कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणुकीचा बिगूल वाजल्यावर त्याती उत्साह दुरावतो. तशीच परिस्थिती आजही आहे. मात्र, एकाच जागेवर दोनपेक्षा अधिक जणांनी दावेदारी केल्याने त्याचा उत्साह मावळतो. शहरात अनेक इच्छुकांबाबत ही परिस्थिती उद्भवली आहे. यात काँग्रेस आणि भाजप या दोन मुख्य पक्षांतील इच्छुकांचा संबोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसफं्रटमधील खोडके समर्थक नगरसेवकांनी पंजावर दावेदारी केली आहे. तर दुसरीकडे लहान पक्ष आणि काही अपक्षही काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून नगरसेवक होण्याची स्वप्न दुभंगणार नाही ना? या हुरहुरीने काहींना ग्रासले आहे.
२०१७च्या पूर्वार्धात ८७ जागांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. प्रदेश आणि राष्ट्र अशा दोन्ही पातळींवर भाजपची सत्ता असल्याने भाजपकडे इच्छुकांचा सर्वाधिक कल आहे. त्यामुळे एकाच वार्डात भाजपच्या पक्षसंघटनेमध्ये वाहून घेतलेला कार्यकर्ता आणि दुसरीकडे आयात केलेले एकापेक्षा अधिक इच्छुक असा सामना रंगणार आहे. (प्रतिनिधी)

श्रेष्ठींनी करावा विचार
निवडून येण्याची क्षमता हा पक्ष उमेदवारी मिळवण्याचा निकष असला तरी किमान ज्या ठिकाणी पक्षाची स्थिती आता अनुकुल आहे आणि थोडा आधार मिळाला तर कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, तेथे तरी पक्षाने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे.

Web Title: Association workers dreams of candidacy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.