धारणी नगरपंचायतला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:45+5:302021-05-28T04:10:45+5:30

धारणी पंकज लायदे पंकज लायदे धारणी : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रात असलेल्या धारणी नगरपंचायतचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या ...

Assumption of the Chief Officer in charge of Dharani Nagar Panchayat | धारणी नगरपंचायतला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचे ग्रहण

धारणी नगरपंचायतला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचे ग्रहण

Next

धारणी पंकज लायदे

पंकज लायदे

धारणी : मेळघाटातील अतिदुर्गम क्षेत्रात असलेल्या धारणी नगरपंचायतचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या कार्यकाळात फक्त एकच नियमित मुख्याधिकारी मिळाले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची बदली झाली. दीड वर्ष लोटले पण त्यांच्या जागेवर नियमित मुख्याधिकारी नगरपंचायतला मिळाले नसल्याने स्थापनेपासूनच नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पदाला ग्रहण लागले.

सध्याही नगरपंचायतचा कारभार प्रभारी अधिकार्याकडे आहे. ते दोन दिवस फक्त धारणीत कामकाज पाहतात. इतर दिवस धारणी नगरपंचायत वाऱ्यावर असते. त्यामुळे शहर विकासाला बाधा निर्माण झाली असून नियमित मुख्याधिकारी देण्याची मागणी धारणीवासीयांनी केली आहे.

धारणी शहरात सन २०१५ मध्ये नगरपंचायतची स्थापना झाली होती. धारणी नगरपंचायतमध्ये कुठलाही बदल झाला नसून जशी ग्रामपंचायतची परिस्थिती होती. त्याच प्रमाणे सध्याची परिस्थिती दिसून येत आहे सध्यस्थितीत नगरपंचायतचा कारभार फक्त चार कर्मचाऱयांच्या भरवशावर असून त्याच कर्मचार्याकडे मागील सहा वर्षांपासून अतिरिक्त प्रभार देऊन नगरपंचायतचे कामकाज सुरू आहे.

नगरपंचायत एक वर्षाचा कार्यकाळ झाल्यानंतर सहा महिन्यांचा कार्यकाळ लेखाधिकारी अचलपूर यांनी सांभाळला. त्यानंतर तहसीलदार, नायब तहसीलदार व चिखलदरा मुख्याधिकारी यांनी दीड वर्षे प्रभारी कार्यकाळ सांभाळला. त्यांनतर नव्याने नगरपंचायतला मुख्याधिकारी मिळाले. त्यांनी तीन वर्षे कार्यकाळ सांभाळला. त्यांनतर पुन्हा नायब तहसीलदारांकडे प्रभार आला. त्यांनी तीन महिने काढल्यानंतर चिखलदरा येथील मुख्याधिकार्यकडे पुन्हा धारणीचा प्रभार देण्यात आला. प्रभारी अधिकाऱ्यांमुळे कोणतेही विकास कामे झाले नाहीत.

नगरपंचायतची मुदत संपली

धारणी नगरपंचायतचा कार्यकाळ २९ डिसेंबर २०२० ला संपल्याने नगरपंचायतवर प्रशासक म्हणून मेळघाटच्या उपविभागीय अधिकारी आयएएस मिताली सेठी नगरपंचायतचे कामकाज सांभाळत आहे. त्यांच्याकडे आधीच प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचा कारभार आहे. तरी सुद्धा नगरपंचायतला प्रशासक म्हणून त्याची नियुक्ती असताना त्यांनी प्रभारी मुख्याधिकऱ्यासोबत काम करत आहे.

Web Title: Assumption of the Chief Officer in charge of Dharani Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.