महापालिकेचे ‘आऊट सोर्सिंग’ प्रकरणी ‘आस्ते कदम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:10 AM2021-07-16T04:10:28+5:302021-07-16T04:10:28+5:30

अमरावती : महापालिकेत २९५ कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदेबाबत तक्रारींचा ओघ कायम आहे. दी महात्मा फुले मल्टिसर्व्हिसेसने ...

'Aste Kadam' in Municipal Corporation's 'Outsourcing' case | महापालिकेचे ‘आऊट सोर्सिंग’ प्रकरणी ‘आस्ते कदम’

महापालिकेचे ‘आऊट सोर्सिंग’ प्रकरणी ‘आस्ते कदम’

Next

अमरावती : महापालिकेत २९५ कंत्राटी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-निविदेबाबत तक्रारींचा ओघ कायम आहे. दी महात्मा फुले मल्टिसर्व्हिसेसने इटकॉन्स एजन्सीच्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले असून, सर्वांत कमी दर असूनही डावलल्याचा आक्षेप घेतला आहे. मात्र, जुलै रोजी होणाऱ्या स्थायी समितीत या एजन्सी नियुक्तीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राजकीय दबाव वाढल्याने निर्णय घेताना आता प्रशासन ‘आस्ते कदम’च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांना मंगळवारी देण्यात आलेल्या निवेदनातून दी महात्मा फुले मल्टिसर्व्हिसेसने ‘आऊट सोर्सिंग’ निविदेत सर्वांत कमी दर असताना डावलल्या जात असल्याबाबत लक्ष वेधले आहे. संस्थेने निविदेच्या अटी-शर्ती पूर्ण केल्या असून, सर्वांत कमी दर आहे. त्यामुळे हे दर स्वीकार करुन कार्यारंभ आदेश द्यावे, अशी मागणी जयकुमार काळे यांनी केली आहे. ई-निविदेत आठ एजन्सीत सहभाग घेतला आहे. असे असताना इटकॉन्सने ईएमडी प्रमाणपत्र, एनएसआयसी नोंदणी केलेली नाही. शॉप ॲक्ट मुदतबाह्य आहे. अनुभवदेखील नाही. ही एजन्सी माहिती, तंत्रज्ञानाशी निगडीत नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे. एकीकडे तक्रारींचा ओघ वाढत असताना महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासंदर्भात निवड समितीने एजन्सी नियुक्तीबाबत मते नाेंदविली आहे. आता एजन्सी नियुक्तीबाबत अंतिम निर्णयासाठी गुरूवारी स्थायी समितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तर दुसरीकडे ‘आऊट सोर्सिंग’ ही निविदा पुन्हा बोलवण्यात याव्यात, असा रेटा महापालिका प्रशासनावर वाढत आहे.

काेट

तक्रारीच्या अनुषंगाने खात्री करण्यात येत आहे. मात्र, जेव्हा तांत्रिक निविदा उघडल्या तेव्हाच आक्षेप घेतला तर प्रश्न सुटला असता. आता निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना तक्रारी, आक्षेप घेणे संयुक्तिक नाही. परंतु, याप्रकरणी प्रशासन नियमानुसारच कार्यवाही करेल.

- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

Web Title: 'Aste Kadam' in Municipal Corporation's 'Outsourcing' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.