अमरावती विभागातील १८ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2018 07:42 PM2018-01-05T19:42:25+5:302018-01-05T19:45:04+5:30

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

Atal tinkering labs in 18 schools in Amravati division | अमरावती विभागातील १८ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब

अमरावती विभागातील १८ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब

googlenewsNext

जितेंद्र दखने

अमरावती : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश आहे. अमरावती विभागातील १८ शाळांपैकी सहा अमरावती जिल्ह्यातील आहेत.

मुलांना विज्ञानाची गोडी लागून जिज्ञासा वाढावी व त्यांनी उपकरणे तयार करून संशोधनास प्रवृत्त व्हावे, या हेतूने अटल टिंकरिंग लॅब शाळांमध्ये उभारण्यात येत आहेत. वैज्ञानिक साधने व विविध उपकरणे यासाठी नीती आयोगाकडून निधी दिला जातो. देशातील ३८८ जिल्हे व ७९ स्मार्ट शहरांतील २ हजार ४३२२ शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मागील वर्षी देशभरातील ९२८ शाळांचा या अभिनव योजनेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये राज्यातील ७५ शाळांचा समावेश होता. नीती आयोगाचे जाहीर केलेल्या दुसºया टप्प्यात राज्यातील ११६ शाळांचा समावेश झाला आहे. त्यामुळे एकूण १९१ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. अमरावती विभागातील १८ शाळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांना वैज्ञानिक गोडी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व ग्रामीण या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना २० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.


जिल्हानिहाय शाळा
अमरावती    - ०६
अकोला    - ०१
बुलढाणा    - ०४
यवतमाळ    - ०३
एकूण        - १८ 

Web Title: Atal tinkering labs in 18 schools in Amravati division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.