परतवाड्यातील एटीएम बंद होळीच्या तोंडावर ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 05:00 AM2020-03-08T05:00:00+5:302020-03-08T05:00:13+5:30

बस स्टँडसमोरील बँक ऑफ बडोद्याचे एटीएम चार दिवसांपासून बंद पडले आहे. तसा तेथे बोर्डच लागला आहे. बँकेत आत चौकशी केली असता, आम्ही कॅश टाकली आहे. सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, असे सांगितले गेले. बँक ऑफ बडोदाचे एटीएम नेहमीच समस्याग्रस्त राहते. कधी कॅश नसते, तर कधी बंद असते.

The ATM in the backyard closes in front of Holi | परतवाड्यातील एटीएम बंद होळीच्या तोंडावर ठणठणाट

परतवाड्यातील एटीएम बंद होळीच्या तोंडावर ठणठणाट

Next
ठळक मुद्देग्राहक त्रस्त। अमरावतीकडे धाव; बाजारहाट करायचा कसा?

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील अपवाद वगळता सर्वच एटीएम बंद पडले आहेत. होळीच्या तोंडावर मागील तीन दिवसांपासून एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. शहरभर फिरूनही एटीएममधून कॅश मिळत नसल्यामुळे लोक त्रस्त आहेत.
बस स्टँडसमोरील बँक ऑफ बडोद्याचे एटीएम चार दिवसांपासून बंद पडले आहे. तसा तेथे बोर्डच लागला आहे. बँकेत आत चौकशी केली असता, आम्ही कॅश टाकली आहे. सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, असे सांगितले गेले. बँक ऑफ बडोदाचे एटीएम नेहमीच समस्याग्रस्त राहते. कधी कॅश नसते, तर कधी बंद असते.
कॉटन मार्केटलगत भारतीय स्टेट बँकेच्या कृषी शाखेत एटीएम आहे. ते एटीएमही तीन दिवसांपासून आऊट ऑफ सर्व्हिस पडले आहे. त्यातून कॅशच मिळत नाही. साधा पिनही तेथे जनरेट झाला नाही. कश्यप पेट्रोल पंपजवळील एटीएम बंद आहे. जयस्तंभ चौकातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम, नगर परिषद समोरील युनियन बँकेचे एटीएम, जगदंब चौकातील एक्सीस बँकेचे एटीएम, पोलीस ठाण्याजवळील एचडीएफसी बँकेचे एटीएम बंद पडले आहे. या एकाही एटीएममधून पैसे निघेनासे झाले आहे.
शहरात गुरुवारपासून एटीएमची हीच स्थिती आहे. ग्राहकांच्या खात्यातून न चुकता एटीएम सेवा शुल्क परस्पर कापून घेणाऱ्या या बँकांना मागील तीन दिवसांपासून साधी दखलही घ्यावशी वाटलेली नाही. गुरुवार बाजाराचा दिवस, होळीचा बाजार, मेळघाटपासून सर्वांचीच गर्दी परतवाड्यात असते. या बाजारालाही एटीएम बंदचा फटका बसला आहे.


१०० च्या नोेटाही नाहीत
पूर्वी एटीएममधून दोन हजारांच्या नोेटा अधिक निघायच्या. आता केवळ ५०० रुपयांची नोट एटीएममधून बाहेर पडते. ज्याला १०० किंवा २०० रुपयांचेच काम असेल, त्याला उगाचच ५०० रुपये काढावे लागतात. जुळ्या शहरातील सर्वच एटीएममध्ये कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. बँका त्याबाबत चकार शब्दही बोलायला तयार नाहीत.

Web Title: The ATM in the backyard closes in front of Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम