वलगावात घटस्फोटित महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:18 AM2020-12-05T04:18:52+5:302020-12-05T04:18:52+5:30
अमरावती : घटस्फोटित महिलेवर एका युवकाने अत्याचार केल्याची घटना वलगाव येथील मारवाडीपुऱ्यात १६ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी ...
अमरावती : घटस्फोटित महिलेवर एका युवकाने अत्याचार केल्याची घटना वलगाव येथील मारवाडीपुऱ्यात १६ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा नोंदविला.
पोलीस सूत्रांनुसार, राजू ज्ञानेश्वर देशभ्रतार (३५, रा. लढ्ढा प्लॉट, बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात वलगाव ठाण्यात एका महिलेने तक्रार नोंदविली. फिर्यादी महिलेचे २०१० मध्ये लग्न झाले. तिला दोन मुली व एक मुलगा असून, पाच वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. २०१८ मध्ये बहिणीच्या सहकार्याने ती बडनेरा येथे भाड्याच्या रूममध्ये राहत असताना आरोपीसोबत तिची ओळख झाली. त्याने लग्नाचे आमिष देऊन तिचे शारीरिक शोषण केले. मात्र, लग्नास नकार दिला. युवकाच्या त्रासाला कंटाळून ती वलगावात आईच्या शेजारी भाड्याने राहू लागली. राजूने तेेथे तिला गाठून शोषण केले. दुसऱ्या लग्नाचा बेत आखला जात असल्याने तिने बदनामीपोटी कुणालाही सांगतिले नाही. मात्र, २ डिसेंबर रोजी ती आईकडे असताना, राजूने रात्री येऊन घरातील साहित्य फेकले. महिलेने वडिलांना सोबत घेऊन घराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी पेट्रोलची बॉटल आढळून आली. तुझे कपडे व घरातील साहित्य जाळून टाकेल, अशी धमकी राजूने महिलेला दिली होती. मुलीवर ॲसिड टाकण्याची धमकीही त्याने दिली. तिच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी भादंविचे कलम ३७६, ४५२, ५०६(ब),४५६, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला.