युवतीवर अत्याचार, डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:14 AM2021-03-26T04:14:53+5:302021-03-26T04:14:53+5:30

पोलीस सूत्रांनुसार, डॉ. शोएब सय्यद असे आरोपी वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, १९ मार्चला ती ड्युटीवर गेली. ...

Atrocities on young woman, filing a case against the doctor | युवतीवर अत्याचार, डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

युवतीवर अत्याचार, डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Next

पोलीस सूत्रांनुसार, डॉ. शोएब सय्यद असे आरोपी वैद्यकीय व्यावसायिकाचे नाव आहे. पीडिताच्या तक्रारीनुसार, १९ मार्चला ती ड्युटीवर गेली. डॉक्टरने तिला नाईट ड्युटीसाठी थांबून घेतले. यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. याशिवाय जातिवाचक शिवीगाळ करीत, वाच्यता केल्यास इंजेक्शन देऊन संपवेन, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील करीत आहेत. डॉ. शोएबने व्हिडीओ असल्याची धमकी देऊन युवतीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचाराला कंटाळून तिने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास सांगितली.

आरोपी पसार

घटनेनंतर आरोपी डॉक्टर पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आल्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: Atrocities on young woman, filing a case against the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.