आमदार बांगर यांच्या वाहनावर हल्लाबोल प्रकरण : २० शिवसैनिकांविरुद्ध 'हाफ मर्डर'चा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2022 10:46 AM2022-09-27T10:46:26+5:302022-09-27T10:48:39+5:30

पोलिसांपुढे आत्मसमर्पण

Attack on MLA Santosh Bangar's vehicle case: A case of 'half murder' has been registered against 20 Shiv Sainiks | आमदार बांगर यांच्या वाहनावर हल्लाबोल प्रकरण : २० शिवसैनिकांविरुद्ध 'हाफ मर्डर'चा गुन्हा दाखल

आमदार बांगर यांच्या वाहनावर हल्लाबोल प्रकरण : २० शिवसैनिकांविरुद्ध 'हाफ मर्डर'चा गुन्हा दाखल

Next

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : श्री देवनाथ मठात दर्शन घेऊन परतणाऱ्या आ. संतोष बांगर यांच्या वाहनावर स्थानिक लाला चौकात हल्लाबोल करणाऱ्या शिवसैनिकांच्या धरपकडीसाठी रविवारी मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी सूत्रे हलविली. घटनेप्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठातून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार व शिंदे गटाचे समर्थक संतोष बांगर हे रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास दर्शन करून निघताच लाला चौक येथे उपस्थित १५ ते २० शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनावर अचानक हल्ला चढविला. ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘पन्नास खोके एकदम ओके’, ‘संतोष बांगर गद्दार है’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनावर थापा मारल्या. या आकस्मिक घटनेने शहरात खळबळ उडाली.

यावेळी आमदार बांगर यांच्यासमवेत कुटुंबीय तसेच शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल अरबट (रा. दर्यापूर), मुन्ना ईसोकार वाहनात उपस्थित होते. दरम्यान ठाणेदार वानखेडे यांनी आरोपी अभिजीत भावेच्या हॉटेलचे रस्त्यावर आलेले पन्नीचे शेड तडकाफडकी नगर परिषद यंत्रणेद्वारे काढून हे अतिक्रमण मोकळे केले.

पोलीस उपनिरीक्षकाची अक्षम्य चूक?

आ. संतोष बांगर यांच्या दौऱ्यातील बंदोबस्तासाठी एक उपनिरीक्षक व काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. आमदारांच्या ताफ्यासमोर स्थानिक पोलीस ठाण्याचे एक वाहन बंदोबस्ताला होते. वाहनातील उपनिरीक्षकाला शिवसैनिकांच्या हालचाली निदर्शनास आल्या तसेच त्यांच्या उपस्थितीची पूर्वकल्पना असतानाही सदर उपनिरीक्षक व कर्मचाऱ्याने सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती दखल घेतली नसल्याची चर्चा रंगली आहे.

एका दिवसाची पोलीस कोठडी

हल्ल्याच्या आरोपात गुन्हे दाखल झालेले राजेंद्र अकोटकर, अभिजित भावे, महेंद्र दिपटे, गजानन विजयकर, गजानन चौधरी, रवींद्र नाथे, गजानन हाडोळे, मयूर रॉय, शरद फिसके यांनी सोमवारी दुपारी १ वाजता आत्मसमर्पण केले. आणखी पाच ते सहाजणांचा हल्लेखोरांमध्ये समावेश असल्याचे ठाणेदार वानखडे यांनी सांगितले. वृत्त लिहिस्तोवर त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात येणार होते.

आमदार संतोष बांगर; छे, असंतोष नांगर!

शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर अंजनगाव सुर्जी येथे कडव्या शिवसैनिकांनी हल्लाबोल केला. गाडीच्या दारावर बुक्क्या व चपला मारल्या म्हणून त्या शिवसैनिकांवर हाफ मर्डरची केसदेखील लावण्यात आली. त्यावर आ. बांगर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. वाघाचे काळीज, एक घाव, दोन तुकडे करणारी त्यांची प्रतिक्रिया व त्याआधी अंजनगावला घडलेली घटना जोडून सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बांगर यांच्यावर ‘चोराप्रमाणे हल्ला करणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत’ या सोशल व्हायरल प्रतिक्रियेवर ‘टच केले तर राजीनामा देणार होता गद्दार, अरे तू चोरासारखा पळालास, तुम्हीपण चोरासारखे पळून गेलेत, असे भन्नाट रिप्लाय पडत आहेत. एक-दोन प्रतिक्रिया तर भन्नाटच आहेत. ‘कृपया असंतोष नांगर यांना ट्रोल करू नका, ते शब्दाचे पक्के आहेत. राजीनामा देतील. दुसरी अशी. ‘अग्गबाई, साहेब चिडलेत, राजीनामा देणार की काय? अशाप्रकारे या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

Web Title: Attack on MLA Santosh Bangar's vehicle case: A case of 'half murder' has been registered against 20 Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.