अंबाडा येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:01:15+5:30
अंबाडा येथील वासनकर कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. रविवारी रात्री दोन वाजता दरम्यान अज्ञाताने एटीएममध्ये प्रवेश केल्याची माहिती हैदराबाद येथील विजलंस टीम ऑफिसच्या माध्यमातून अंबाडा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विवेकानंद साबळे यांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील अंबाडा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शाखा व्यवस्थापक, पोलीस व स्थानिकांच्या सजगतेने तो प्रयत्न फसला. चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला काही तासांत अटक करण्यात आली. रविवारी रात्री दीड ते दोनच्या ही घटना उघड झाली.
अंबाडा येथील वासनकर कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. रविवारी रात्री दोन वाजता दरम्यान अज्ञाताने एटीएममध्ये प्रवेश केल्याची माहिती हैदराबाद येथील विजलंस टीम ऑफिसच्या माध्यमातून अंबाडा येथील सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक विवेकानंद साबळे यांना मिळाली. एटीएममधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करण्याचा तो प्रयत्न करीत असल्याची माहिती साबळे यांनी तत्काळ मोर्शीचे ठाणेदार संजय सोळंके यांना दिली. पोलीस पथक तत्काळ अंबाड्यात पोहचले. नागरिक गोळा होईपर्यंत सदर चोर चार फुटाचा सब्बल घटनास्थळी टाकून पळून गेला. सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद झाला. त्याआधारे मोर्शी पोलिसांनी संशयित म्हणून संगम दीपक मोहोड (रा.अंबाडा) याला अटक केली. सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.