मायवाडी शिवारातील शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:09 AM2021-07-04T04:09:22+5:302021-07-04T04:09:22+5:30

मोर्शी : तालुक्यातील माळवाडी हलकामध्ये कार्यरत असलेल्या तलाठी व तहसीलदार यांच्या संबंधित शेतकऱ्यांच्या अनुदानात अफरातफर झाल्याची ऑडिओ ...

Attempt to defraud farmers in Mayawadi Shivara | मायवाडी शिवारातील शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

मायवाडी शिवारातील शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न

Next

मोर्शी : तालुक्यातील माळवाडी हलकामध्ये कार्यरत असलेल्या तलाठी व तहसीलदार यांच्या संबंधित शेतकऱ्यांच्या अनुदानात अफरातफर झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

मायवाडी शिवारातील शेतकऱ्यांना डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२० या काळातील गारपीटग्रस्तांना अनुदान देण्याची यादी या हलकामध्ये कार्यरत असलेल्या तलाठी कार्यालयामार्फत तयार करण्यात आली होती. सदरहू गारपीटग्रस्तांचे अनुदान जवळपास अंदाजे ४ लाख ९८ हजार ९६० असे होते. परंतु, या प्रकरणाबाबत तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठ्याकडून बँकेत पाठवलेले यादी व प्रत्यक्ष यादी यामध्ये तफावत आढळून आली आहे. यामध्ये लाभार्थी नसलेल्या लोकांची नावे टाकून अनुदान लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संबंधित तलाठ्याने केलेला घोळ तहसीलदारांच्या लक्षात आल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी त्या पोराला हाताशी घेऊन ही ऑडिओ क्लिप बनवून स्वतः पसरवत आहे. चौकशी सुरू केली आहे.

येथून जवळच असलेल्या मायवाडी हलक्या मधील तलाठी गेल्या दिड महिन्यांपासून रजेवर असल्याने हा प्रकार तलाठ्यांनी केले नसल्याची चर्चा असून व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये त्याच्या हाताखाली काम करणारा मुलगा व तलाठी यांची पत्नी यांचे संभाषण दिसून आले आहे यामध्ये तलाठ्याच्या हाताखाली काम करणार्‍या मुलाने अनुदानाच्या यादीत अफरातफरीचे काम मी तहसीलदाराच्या संगनमताने केली आहे असे बोलल्या गेले व या मुलाने मी तलाठ्यांची खोटी सही मारली व मर्जीतील लोकांचे नावे टाकून शेतकऱ्यांचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला असे सुद्धा तलाठ्याच्या पत्नीला व्हायरल ऑडिओ क्लिप मध्ये सांगितले. विशेष म्हणजे या हल्ल्यामध्ये कोतवाल म्हणून एक महिला प्रतिनिधी आहे तिच्या जागेवर हा मुलगा काम करीत होता

संबंधित तलाठीने केलेला घोळ तहसीलदारला लक्षात आल्यावर स्वतः ला वाचवण्यासाठी त्या पोराला हाताशी घेऊन ही ऑडिओ क्लिप बनवून स्वतः पसरवत आहे. चौकशी सुरू केली आहे, कारवाई होणारच, तलाठी स्वतः ला वाचवण्यासाठी सरळ तहसीलदार चे नाव घेतात कट कारस्थान करतात हे खपवून घेतलं जाणार नाही

सिद्धार्थ मोरे

तहसीलदार मोर्शी

Web Title: Attempt to defraud farmers in Mayawadi Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.