चांदूर बाजार-वलगाव मार्गातील झाडे जाळून तस्करीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:12 AM2021-05-15T04:12:19+5:302021-05-15T04:12:19+5:30
फोटो पी १४ तळवेल तळवेल : चांदूर बाजार ते वलगाव रोडवर अनेक वर्षांपासून उभी असलेली जुनी कडुनिंबाची ...
फोटो पी १४ तळवेल
तळवेल : चांदूर बाजार ते वलगाव रोडवर अनेक वर्षांपासून उभी असलेली जुनी कडुनिंबाची झाडे वाटसरूंना सावली देत असतात. या झाडांचा मध्यरात्री बुंधा जाळून दुसऱ्या दिवशी झाडे तोडून केली जाते. अशा प्रकरणात सावली हिरावणारे समाजकंटकांचा शोधच घेतला जात नाही, तर धुरे जाळणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक बदनाम केले जाते, असा सूर आहे.
सध्या दोन्ही हंगामांतील पिके काढून झाल्यानंतर शेतीच्या मशागतीची कामे जवळपास पूर्ण होत आहेत. धुऱ्यावरील कचरा व काट्यांसारखी झुडपे नष्ट करण्यासाठी ती जाळली जातात. उन्हाळ्यात रस्त्याच्या कडेला बारीक गवत वाळून गेल्याने हवेमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांपर्यंत आग जाऊ शकते. तस्कर याच बाबीचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लाकडाची तस्करी करीत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची अकारण बदनामी होत आहे.
चांदूर बाजार ते वलगाव मार्गावर गुरुवारी रात्री एक झाडाला अज्ञात व्यक्तीने आग लावली, असा अंदाज वर्तविला जात आहे. कारण कोसळलेल्या झाडाच्या आजूबाजूला टायरी ट्यूबचे अर्धवट जळलेले तुकडे आढळले. शुक्रवारी सकाळीसुद्धा कोसळ्यावर झाड पेटतच होते. ती नंतर पाणी टाकून आग विझवण्यात आली. संबंधित विभागाने अशा व्यक्तींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
3 Attachments