महापालिका कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटही लिहिली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 12:35 PM2021-12-02T12:35:45+5:302021-12-02T12:37:03+5:30

गिरी यांनी विषाचा घोट घेण्यापूर्वी दोन स्थानिक माध्यमे व एका राजकीय पक्षाच्या युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्याची नावे लिहून ठेवल्याची माहितीही महापालिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

Attempted suicide by a municipal employee; Also wrote a suicide note | महापालिका कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटही लिहिली

महापालिका कर्मचाऱ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटही लिहिली

Next

अमरावती- महापालिकेच्या उद्यान विभागात कार्यरत लिपिक श्रीकांत गिरी यांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आल्याने आणि वेळेत उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. १ डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.

गिरी यांनी विषाचा घोट घेण्यापूर्वी दोन स्थानिक माध्यमे व एका राजकीय पक्षाच्या युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्याची नावे लिहून ठेवल्याची माहितीही महापालिकेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली.

उद्यान विभागात कार्यरत गिरी व एका कंत्राटदाराच्या संगनमताने उद्यान विभागात अनागोंदी माजल्याचा आरोेप करण्यात आला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप मागे घेण्यासाठी गिरी यांना काही रक्कमदेखील मागण्यात आली होती. मात्र, तो ताण सहन न झाल्याने गिरी यांनी आत्मघाताचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गिरी यांना बुधवारी तातडीने राजापेठ स्थित एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Web Title: Attempted suicide by a municipal employee; Also wrote a suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.