प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या पोलिसांवर होणार कारवाई, कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 06:33 PM2017-12-29T18:33:48+5:302017-12-29T18:34:30+5:30
राज्यभरातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अशा कर्मचा-यांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे आता ते प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
- वैभव बाबरेकर
अमरावती : राज्यभरातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अशा कर्मचा-यांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे आता ते प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखून जनतेला जीवित व वित्तहानीपासून संरक्षण देण्यासाठी पोलीस यंत्रणा कर्तव्य बजावत आहे. बदलत्या काळानुसार पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ होणे अपेक्षित आहे. गुन्हेगारीचे स्वरूप, दहशतवादी हल्ल्यासारखे आव्हाने पोलिसांना पेलावे लागत आहेत. अशा विविध कृत्यांच्या अनुषंगाने पोलीस अधिक सक्षम होणे आवश्यक असून त्याचे मनोधैर्य वाढविणे गरजचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस दलासाठी प्रशिक्षण धोरण राबविण्यात आले आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी पोलीस मागे राहता कामा नये, यासाठी शासनातर्फे कठीण प्रशिक्षणाचे धोरण राबविण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात निवड झालेले काही पोलीस कर्मचारी प्रशिक्षणास टाळाटाळ करताना आढळून आले आहे. सिक लीव्ह, आजार, अपघात वा कौटुंबिक कारणे सांगून प्रशिक्षणास गैरहजर राहणे, आदी कारणे सांगितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधी पोलीस आयुक्तांनी काही कर्मचाºयांवर कारवाई केली असून, यापुढेही प्रशिक्षणास टाळाटाळ करणाºया पोलिसांवर शिस्तंभग किंवा निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
आधुनिक तंज्ञत्रानाच्या युगात पोलिसांना सक्षम राहणे गरजेचे आहे. मात्र, काही पोलीस कर्मचारी कोणतेही कारण सांगून प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ करीत होते. अशा कर्मचाºयांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. कारवाईच्या धास्तीने आता पोलीस प्रशिक्षणास जात आहे.
दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती.