जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:09 AM2021-04-29T04:09:41+5:302021-04-29T04:09:41+5:30

अमरावती : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने उपस्थितीवर मर्यादा आणली आहे. १५ टक्केच कर्मचारी ...

Attendance of Zilla Parishad staff decreased | जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती घटली

Next

अमरावती : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने उपस्थितीवर मर्यादा आणली आहे. १५ टक्केच कर्मचारी शासकीय कार्यालयात उपस्थित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू असून दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी कार्यालयात कामकाज करत आहे.यात आरोग्य विभागातील कर्मचारी वगळता जिल्हा परिषद मोजकेच कर्मचारी कार्यालयात हजर राहत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती १५ टक्के करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांनी करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत मोजकेच कर्मचारी हजर असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद मुख्यालयात साधारणत: ७०० कर्मचारी आहेत. त्यांच्या १५ टक्के म्हणजे जवळपास १०० कर्मचारी उपस्थित राहत असल्याचा अंदाज आहे.

बॉक्स

अभ्यागतांना कार्यालयात नो एन्ट्री!

जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आवश्यक असेल तर कार्यालयप्रमुख हे त्यांचे परवानगीने अभ्यागतांना पास देतील. परंतु याबाबत संबंधित अभ्यागत यांच्याकडे त्यांचा आरटीपीसीआर रिपोर्ट असल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. बाहेरील नागरिकांव्दारे प्राप्त होणारे टपाल, तक्रारी ह्या प्रत्यक्ष त्यांचेकडून कार्यालयात न घेता त्या कार्यालयाचे ई-मेलवर पाठविण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, अशा सूचना सीईओंनी दिल्या आहेत.

Web Title: Attendance of Zilla Parishad staff decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.