जिल्ह्यातील ६० रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया
By admin | Published: December 28, 2015 12:27 AM2015-12-28T00:27:57+5:302015-12-28T00:27:57+5:30
जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांपैकी ६० रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. यापासून महसूल विभागाला तब्बल १२ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे....
१२ कोटींचे उत्पन्न : महसुलात होणार वाढ
अमरावती : जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांपैकी ६० रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. यापासून महसूल विभागाला तब्बल १२ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे. याशिवाय उर्वरित रेतीघाटांचेही लिलाव होताच या महसुलाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत रेतीघाटात पाच कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे.
जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून वाहत असलेल्या ११ नद्यांवरील ८१ घाटांमधून वाळू उपसा केला जातो. जिल्ह्यात सर्वाधिक ११ रेतीघाट भातकुली तालुक्यात असून तेथील घाटांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. त्यामुळे या भागातून अवैध वाळूतस्करी होत आहे. काही दिवसांपूर्वीच भातकुलीचे तहसीलदार मनोज येळे यांच्यावर वाहन आणण्याचा प्रयत्न केला. याशिवाय इतरही ठिकाणी शहरात अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी राबविलेल्या वाळू साठ्यावरील धाडसत्रात रेतीमाफिया कडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या धाड सत्रामुळे वाळू साठ्यावर निर्बंध आणले होते. याचा परिणाम म्हणून वाळू घाटांच्या लिलावर झालेला दिसून येत आहे. मागी, वर्षीच्या तुलनेत ७ कोटी रूपयांचे अधिक उत्पन्न प्राप्त होणार असल्याचे महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरी व ग्रामीण भागात सिमेंट क्रॉक्रिटच्या पक्क्या घरांचे मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहेत. याशिवाय निवडणुकांपूर्वी घोषित करण्यात आलेली विकासकामेदेखील बऱ्याच प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया केव्हा सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)