३० हजाराच्या लाचप्रकरणी लेखा परीक्षा लिपिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:28+5:302021-06-24T04:10:28+5:30
अमरावती : सेवा पुस्तकामध्ये त्रुटी असल्याने मागील एक वर्षापासून सेवा निवृत्ती वेतन मिळत नसल्याने सदर वेतन पडताळणी करून देण्याकरिता ...
अमरावती : सेवा पुस्तकामध्ये त्रुटी असल्याने मागील एक वर्षापासून सेवा निवृत्ती वेतन मिळत नसल्याने सदर वेतन पडताळणी करून देण्याकरिता संचालक, लेखा परीक्षा कार्यालयाच्या लिपिकाला ३० हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बियाणी चौकात केली. सहायक संचालक स्था. नि. लेखापरीक्षा लेखा कार्यालयातील परीक्षा लिपिक (वित्त विभाग) अर्जुन गंगाराम राठोड (५२) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
एका ५९ वर्षीय इसमाने त्याची तक्रार एसीबीकडे केली होती. या प्रकरणी २२ जून रोजी पडताळणी करण्यात आली होती. तक्रारदार हे सेवानिवृत्त असून त्यांनी २२ जून २०२१ रोजी एसीबीकडे तक्रार नोंदविली. त्यांचे सेवा पुस्तकामध्ये त्रुटी असल्याने एक वर्षापासून त्यांना निवृत्तीवेतन मिळत नसल्याने वेतन पडताळणी करून देण्याकरिता आरोपीने फिर्यादीला ३० हजाराच्या लाचेची मागणी केली. एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली. पुढील कारवाईसाठी एसीबीच्या पथकाने आरोपीला फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.