लेखकाचा कुत्रा’ एकांकिकेने नाट्य पडदा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:14 AM2020-12-31T04:14:22+5:302020-12-31T04:14:22+5:30

चांदूर रेल्वे : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेल्या नाट्यगृहाचा पडदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उघडला. अखिल भारतीय नाट्य परिषदेची अमरावती शाखा ...

The author's dog's one-act play opens the screen | लेखकाचा कुत्रा’ एकांकिकेने नाट्य पडदा उघडला

लेखकाचा कुत्रा’ एकांकिकेने नाट्य पडदा उघडला

Next

चांदूर रेल्वे : कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेल्या नाट्यगृहाचा पडदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उघडला. अखिल भारतीय नाट्य परिषदेची अमरावती शाखा आणि महानगरपालिका यांच्यावतीने अमरावती येथील टाऊन हॉलमध्ये एकांकिका स्पर्धा घेण्यात आली. यात येथील पीपल्स कला मंचच्यावतीने ''लेखकाचा कुत्रा'' या दमदार एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.

दोन दिवसीय एकांकिका स्पर्धा २६ डिसेंबर रोजी सुरू झाल्या. त्यात ‘लेखकाचा कुत्रा’ ही एकांकिका झाली. नाट्यलेखनाकडून मालिका लेखनाकडे वळलेला लेखक पैशासाठी आपली नीतिमूल्ये सोडून कसा लिहायला लागतो आणि त्याला परत रंगभूमीकडे आणण्यासाठी त्याच्या शिष्याची धडपड हे द्वंद्व या एकांकिकेत पाहायला मिळाले. एकांकिकेचे लेखन विशाल कदम यांचे असून, विवेक राऊत, अनुज ठाकरे आणि मंगेश उल्हे यांनी भूमिका साकारल्या. एकांकिकेला संगीत मनीष हटवार यांनी दिले, तर प्रकाश योजना अमर इमले यांनी केली. नेपथ्य मयूर शिदोडकर, विहान राऊत यांचे होते.

-------------------------------------------------------

Web Title: The author's dog's one-act play opens the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.