वाहन रॅलीने दुमदुमली अंबानगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:44 PM2018-04-11T23:44:13+5:302018-04-11T23:44:13+5:30
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात बुधवारी भव्य वाहन रॅली काढण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेच्या माळी व बहुजन समाज संघटनेच्यावतीने गाडगेनगरातील गाडगेबाबा मंदिरापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. चित्रा चौकात सभा घेऊन रॅलीची सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात बुधवारी भव्य वाहन रॅली काढण्यात आली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेच्या माळी व बहुजन समाज संघटनेच्यावतीने गाडगेनगरातील गाडगेबाबा मंदिरापासून दुचाकी रॅली काढण्यात आली. चित्रा चौकात सभा घेऊन रॅलीची सांगता झाली.
गाडगेबाबा यांना अभिवादन करून सकाळी ९ वाजता निघालेली रॅली गाडगेनगर मार्गे पंचवटी चौकात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली इर्विन चौकापर्यंत पोहोचली. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कॉटन मार्केट मार्गे जयस्तंभ चौकात पोहोचून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दादासाहेब खापर्डे यांच्या पुतळ्याला हारार्पण करून रॅली चित्रा चौकात पोहोचली. तेथे सभा घेण्यात आली. यावेळी आ.सुनील देशमुख यांनी फुलेंच्या विचारावर मत व्यक्त केले. रॅलीत आयोजन समितीचे श्रीकांत नागरिकर, श्रीकृष्ण बन्सोड, गणेश खारकर, श्रीकृष्ण माहोरे, मिलिंद वागळे, नीलिमा भटकर, व्यंकटराव खोब्रागडे, अरविंद आकोलकर, सुयश श्रीखंडे, राजेश्री जढाळे, मनोज भेले, सुनीता भेले, वंदना मडगे यांच्यासह व अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.