ऑटोरिक्षाचालकांचे जगणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:16 AM2021-06-09T04:16:16+5:302021-06-09T04:16:16+5:30

गेल्या मागच्या वर्षीपासून सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य नागरिक बाहेरगावी जात नसत. त्यामुळे ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला ...

Autorickshaw drivers found it difficult to survive | ऑटोरिक्षाचालकांचे जगणे झाले कठीण

ऑटोरिक्षाचालकांचे जगणे झाले कठीण

Next

गेल्या मागच्या वर्षीपासून सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे सामान्य नागरिक बाहेरगावी जात नसत. त्यामुळे ऑटोरिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प झाला होता. ग्रामीण भागातील ६५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शनसाठी ऑटोरिक्षाचालक बँकेत शहराच्या ठिकाणी घेऊन जात होते. आता मात्र ग्रामीण भागात मिनी बँक झाल्याने ते प्रवासलीदेखील मिळत नसल्याने जगणे कठीण झाले, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशातच अनेक ऑटोरिक्षाचालकांनी बाहेर ठिकाणी संसाराचा गाडा चालवण्यासाठी गवंडीकाम मिळेल त्या मजुरीवर स्वीकारले. ज्या ऑटोरिक्षाचालकांकडे शेती आहे, त्यांनी शेतीचे काम पत्करले. परंतु, ज्यांच्याकडे शेती नाही, असे ऑटोरिक्षाचालकही भाडेतत्त्वावर शेती करीत आहेत. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षी आर्थिक नुकसान झेलावे लागल्याचे काहींनी सांगितले.

ऑटोरिक्षाचालकांना शासनातर्फे अनुदान देण्यात येईल, अशा वारंवार घोषणा केल्या गेल्या. परंतु, अजूनपर्यंत ती मदत मिळाली नसल्याची खंत चालक व्यक्त करीत आहेत.

Web Title: Autorickshaw drivers found it difficult to survive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.