अमरावती विभागातील १० तालुक्यांत सरासरी ६० टक्केपेक्षा कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 06:26 PM2019-08-07T18:26:49+5:302019-08-07T18:27:14+5:30

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सरासरीच्या ५०.२ टक्के पाऊस झाला.

On average, rainfall is less than 3 percent in 6 talukas of Amravati region | अमरावती विभागातील १० तालुक्यांत सरासरी ६० टक्केपेक्षा कमी पाऊस

अमरावती विभागातील १० तालुक्यांत सरासरी ६० टक्केपेक्षा कमी पाऊस

Next

अमरावती - विभागातील पाचही जिल्ह्यात सरासरीच्या ५०.२ टक्के पाऊस झाला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक, तर यवतमाळ जिल्हा माघारला आहे. विभागातील ५६ तालुक्यांपैकी १० तालुक्यांत अर्धा पावसाळा संपला असताना सरासरी ६० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

अमरावती विभागात १ जून ते ७ आॅगस्ट दरम्यान सरासरी ४५४.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना ३८२.७ मिमी पाऊस झाला आहे, याची टक्केवारी ५०.२ इतकी आहे. बुललाडा जिल्ह्यात  १३ ही तालुक्यांची स्थिती चांगली असून, सरासरी ३८४.४ मिमी ऐवजी ४०६ मिमी म्हणजेच १०५.६ टक्के पाऊस झालेला आहे. अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांत सरासरी ४०७.८ मिमी ऐवजी ४१३.५ मिमी पाऊस झाला आहे. याची टक्केवारी १०१.४ इतकी आहे. बार्शी टाकळी तालुक्यात ३९७.१ मिमीऐवजी ४६१.१ मिमी पाऊस पडला. याची टक्केवारी ११६.१ इतकी आहे. वाशीम जिल्ह्यात सरासरी ४६९.४ मिमीऐवजी ३१३.७ मिमी पावसाची नोंद झाली. याची टक्केवारी ६६.८ इतकी आहे.

पाचही तालुक्यांपैकी सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस कारंजा तालुक्यात ५४.६ मिमी झाला आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात सरासरी ४७२.१ मिमीऐवजी ४४६.९ मिमी पावसाची नोंद आतापर्यंत झाली आहे. याची टक्केवारी९४.७ इतकी आहे. यामध्ये चांदूर बाजार व चांदूर रेल्वे तालुक्यात ११७.५ टक्के सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर भातकुली तालुक्यात ५८.१ टक्के पाऊस झाला आहे.

सरासरीच्या ६० पेक्षाही कमी पाऊस तेथे झालेला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यात सरासरी ५३८.८ मिमीपैकी ३३३.१ मिनी पावसाची नोंद झाली आहे याची टक्केवारी ६१.८ इतकी आहे. याच जिल्ह्यातील आठ तालुक्यांत सरासरीच्या ६० टक्केपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. 

Web Title: On average, rainfall is less than 3 percent in 6 talukas of Amravati region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.