ओलितासाठी शेतकऱ्यांचे जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:59 PM2017-11-28T23:59:49+5:302017-11-29T00:00:18+5:30
तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते.
आॅनलाईन लोकमत
वरुड : तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते. मात्र, या पिकांना ओलित करण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहवायस मिळत आहे. यासाठी भारनियमन कारणीभूत ठरले आहे.
विदर्भाचा कॅलिफोर्निया प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर संत्रा, तर २० हजारांपेक्षा अधिक जमिनीमध्ये बागायती पिके आहेत. या पिकांना सप्टेंबरपासून ओलितास सुरुवात केली जातो. पंरतु, महावितरण कंपनीने भारनियमनात वाढ केली असून ते आता ८ तासांचे झाले आहे.
आठवड्यातून तीन-तीन दिवस रात्री व दिवसा असे वेळापत्रक असल्याने शतकºयांना तीन दिवस रात्री ओलीत करावे लागते. या दरम्यान सरपटणारे प्राणी, हिंस्त्र व वन्य प्राण्यांपासून जिवाला धोका होण्याची शक्यता असली तरी जोखीम पत्करून शेतात जावे लागते. महावितरण कंपनीने सलग दिवसा वीजपुरवठा देऊन रात्रीने भारनियमन करावे तसेच तांत्रिक बिघाड आल्यास तात्काळ दुरस्तीकरिता पथक नेमावे, अशी मागणी शेतकºयांतून केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसून शेतीपिके हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले.
तालुक्यात सर्पदंशामुळे शेतकºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तशा घटना लिंगा, कारली, पुसला, गणेशपूर, सावंगी, वाई, सातनूर, शेंदूरजनाघाट, टेंभूरखेड, जरुड, राजुराबाजार, जामगाव (खडका) लोणी, मांगरुळी, हातुर्णा, देऊतवाडा, आमनेर आदी गावात उघडकीस आल्या आहेत.
जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, महावितरण कंपनीची अनास्था आणि वीज भारनियमनामुळे ओलीत होऊ शकत नसल्याने पिके सुकू लागली आहेत.
- उत्तमराव आलोडे,
शेतकरी, बेनोडा