प्रिसिजन फार्मिंग, ई-पीक पाहणी ॲपविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:27+5:302021-09-25T04:12:27+5:30
तिवसा : तालुक्यातील सालोरा खुर्द येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या परिसरात प्रिसिजन फार्मिंग व ई पीक पाहणी ॲप विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन ...
तिवसा : तालुक्यातील सालोरा खुर्द येथील आयुर्वेदिक दवाखान्याच्या परिसरात प्रिसिजन फार्मिंग व ई पीक पाहणी ॲप विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची सलग्न स्वर्गीय आर जी देशमुख कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला रावे च्या सातव्या सतरा चे विद्यार्थी रोशन खोपे प्रज्वल केने यांनी प्राचार्य आदित्य कदम हेमंत पवार मनोज लुंगे भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना माहिती दिली प्रिसिजन फार्मिंग म्हणजे विविध यंत्र व सेंसर यांच्या सहाय्याने केलेली आधुनिक शेती होय अशी माहिती रोशन खोपे याने दिली मेघदूत दामिनी इ पीक पाहणी यासारख्या शासनाने विकसित केलेल्या ॲप ची माहिती आज राज्यपाल के ने याने दिली सरपंच बबीता हरडे उपसरपंच अजय ठाकरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी बारस्कर ग्राम रोजगार सेवक अमित इंगोले यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते याप्रसंगी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
-------------
निंभा येथे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे धडे (फोटो इदलकडे)
भातकुली : तालुक्यातील निंभा येथील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी ॲपद्वारे कशी करावी, यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत पी.आर. पोटे पाटील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोदराव लकडे हिने कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक केले. यासाठी प्रा. पी.डी. देशमुख, राहुल कळसकर, अर्चना बेलसरे यांचे मार्गदर्शन तिने घेतले. यावेळी निंभा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.