येवद्यात आजी-माजी सरपंचांवर प्राणघातक हल्ला

By admin | Published: November 19, 2015 12:46 AM2015-11-19T00:46:29+5:302015-11-19T00:46:29+5:30

बसथांबा परिसरातील घटनायेवदा : क्षुल्लक कारणावरुन दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास ...

In Ayodhya A grand-assassination of former Sarpanchs | येवद्यात आजी-माजी सरपंचांवर प्राणघातक हल्ला

येवद्यात आजी-माजी सरपंचांवर प्राणघातक हल्ला

Next

हल्लेखोरांना अटक : बसथांबा परिसरातील घटनायेवदा : क्षुल्लक कारणावरुन दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास येथील आजी-माजी सरपंचावर दोन माथेफिरूंनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी येवदा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, येवदा येथील माजी सरपंच बाळासाहेब राऊत मंगळवारी दर्यापूरहून येवद्याकडे आले होते. पान खाण्यासाठी बसथांब्याजवळ थांबले असता त्यांच्याशी संदीप मामनकर (२८) व विठ्ठल हिवसे (४०) यांनी शाब्दिक वाद केला. अश्लील शिवीगाळ करुन त्यांना गाडीत शिरुन बेदम मारहाण केली. मारहाणीत ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर या माथेफिरुंनी विद्यमान सरपंच प्रदीप देशमुख यांच्यावरही हल्ला केला. यावेळी देशमुख यांच्या समर्थकांनी आरोपी संदीप मामनकर याला बेदम मारहाण केली.
विठ्ठल हिवसे मात्र घटनास्थळाहून पळाला. यासंदर्भात सरपंच प्रदीप देशमुख यांनी येवदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार एस.के. परकांदे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ४५२, २९४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. येवदा येथे गेल्या काही दिवसांपासून राजकीय गटबाजीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शिस्तप्रिय नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.या घटनेचा अधीक तपास ठाणेदार एस.के. परकांदे, विश्वनाथ मुळे, राजकुमार तायडे, बजरंग इंगळे, मनोज गावंडे करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून गावात घडत असलेल्या अप्रिय घटनांमुळे गावातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. पोलीस याप्रकरणाचा कसोशिने तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: In Ayodhya A grand-assassination of former Sarpanchs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.