आझाद समाज पार्टीचे पाचव्या दिवशीही बेमुदत धरणे सुरूच
By उज्वल भालेकर | Published: October 1, 2023 08:23 PM2023-10-01T20:23:32+5:302023-10-01T20:24:13+5:30
आमदार बळवंत वानखडे यांची आंदोलनाला भेट; सरकारचा केला निषेध
उज्वल भालेकर, अमरावती : राज्य शासनाच्या सरकारी शाळेचे खासगीकरण व नोकरभरती कंत्राटी पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात मागील पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आझाद समाज पार्टीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला रविवारी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनीही सरकारच्या खासगीकरणाचा निषेध करत आंदोलनाला पाठिंबा दिला.
येथील कंत्राटी पद्धतीने तहसीलदार भरण्याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाल्याचे आझाद समाज पार्टीचे म्हणणे आहे. शासकीय सेवेतील आरक्षण संपविण्याचा हा सरकारचा डाव असून, कंत्राटी पद्धतीने नोकरभरतीचा हा निर्णय बहुजन समाजातील विद्यार्थ्यांविरोधातील आहे. एकीकडे परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी होत असताना राज्य सरकारच्या तिजोरीत भरती प्रक्रियेतून २६३ कोटी रुपये जमा झाले आहेत. सामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असल्याचे आझाद समाज पार्टीचे म्हणणे आहे.
यावेळी बेमुदत संपामध्ये डॉ. महेश बलान्से, अनिल फुलझेले, रवी हजारे, नंदू काळमेघ, जितेंद्र रामटेके, सुरेश ठाकरे, संजय गडलिंग, वंदना बोरकर, अशोक इंगोले, वीणा स्वर्गे, लक्षण चाफळकर, ज्योती बोरकर, दिनेश यादव, मनीष साठे, किरण गुडधे, मोहम्मद जाकीर, शेख अलिम, रोहित भटकर, सागर ढोके, डॉ. शिवलाल पवार, विजय सवई, जंजिरसिंग टांग, ज्ञानेश्वर गडलिंग, वर्षा हिरोडे, प्रा. दीपक गवई, सोनल गादर, सुनील खडसे, नारायण चव्हाण, शिवा चव्हाण, समाधान वानखडे, भूषण बनसोड आदी विविध संघटनेचे कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी, महिला यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.