बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 01:13 PM2023-04-07T13:13:08+5:302023-04-07T13:14:00+5:30

तहसील गटात वेढापूरच्या पंधऱ्या-भोंड्याने मारली बाजी, महिला धुरकरी ठरल्या आकर्षण

Baadshah-Ranveer bulls top in Shankarpat at Wathoda Chandas of amravati | बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार

बादशहा-रणवीर ठरले अव्वल; वाठोडा चांदस येथील शंकरपटात थरार

googlenewsNext

वरूड (अमरावती) : तालुक्यातील वाठोडा चांदस येथील यशवंत शंकरपटामध्ये सर्वसाधारण गटात यवतमाळ जिल्ह्यातील बादशहा-रणवीरने, तर तहसील गटात वेढापूरच्या पंधऱ्या-भोंड्या बाजी मारून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय महिला धुरकरी शंकरपटाचे विशेष आकर्षण ठरले.

वाठोडा चान्दस येथे तब्बल चाळीस वर्षांनंतर आ. देवेंद्र भुयार आणि नीलेश मगर्दे मित्र परिवाराच्यावतीने ३ ते ५ एप्रिल दरम्यान यशवंत शंकरपटाचे आयोजन केले होते. यामध्ये १०० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या करण्यात आल्या.

शंकरपटामध्ये सर्वसाधारण गटातून नामदेव नाईक (रा. सजेगाव, ता. दारव्हा, जि.यवतमाळ) यांचा बादशहा व विजू राठोड (रा. दगडथर, ता. महागाव, जि. यवतमाळ) यांचा ''रणवीर यांनी ७.१७ सेकंदात पहिला क्रमाक मिळविला. दुसरा क्रमांक रामप्रसाद राठोड (रा. बैतूल, मध्य प्रदेश) यांच्या बादशाह-नायक यांनी पटकावला आहे. तर तहसील गटामधून आयुष काळबांडे (रा. वेढापूर) यांच्या पंधऱ्या आणि भोंड्या यांनी ७.९२ सेकंदामध्ये पहिला, तर सैन्य दलातील दिनेश हरिभाऊ राऊत (रा. घोराड) यांच्या मंगल्या व चिऱ्या या जोडीने ८.७ सेकंदामध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

महिला धुरकरी लक्ष्मी सोनबावणे (१८, रा. अमरावती) व सीमा पाटील (४०, रा. यवतमाळ) यांनीबी यामध्ये सहभाग घेतला. वरूड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Baadshah-Ranveer bulls top in Shankarpat at Wathoda Chandas of amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.