बाल आरोग्याला ‘विषाणूजन्य तापा’चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 10:02 PM2017-07-30T22:02:54+5:302017-07-30T22:08:14+5:30

ताप, सर्दी व खोकल्याने चिमुरड्यांना वेढल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होत आहे.

baala-araogayaalaa-vaisaanauujanaya-taapaacaa-vailakhaa | बाल आरोग्याला ‘विषाणूजन्य तापा’चा विळखा

बाल आरोग्याला ‘विषाणूजन्य तापा’चा विळखा

Next
ठळक मुद्देखबरदारी घेणे एकमेव उपाय; दरदिवसाला दहा ते पंधरा रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ताप, सर्दी व खोकल्याने चिमुरड्यांना वेढल्याचे शासकीय आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. बालकांना व्हायरल फिव्हर (विषाणूजन्य) तापाचा विळखा आवळत आहे. दरदिवसाला दहा ते पंधरा रूग्ण शासकीय रूग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल होत आहेत. ही आकडेवारी केवळ शासकीय दवाखान्यांची असून खासगी रूग्णालयातील रूग्णांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते. केवळ खबरदारी घेणे, हाच यावरील उपाय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाºया हवेतील विषाणूंमुळे बाल आरोग्य धोक्यात आले आहे. केवळ लहानांनाच नव्हे तर ज्येष्ठांना देखील विषाणूजन्य तापाची बाधा होत असल्याचे चित्र आहे. सर्दी, खोकला आणि ताप अशा लक्षणांसह आढळणारा हा आजार तब्बल आठवडाभर ठाण मांडून राहतो. पावसाळ्यात साधारणत: सर्दी, खोकला व तापाची लक्षणे सर्वाधिक आढळून येतात.
यंदा पावसाळा वेळेवर सुरू झाला नाही. पावसाने मोठी दडी दिली. त्यामुळे वातावरणातही बदल झालेत.

खबरदारी घेणे एकमेव उपाय; दरदिवसाला दहा ते पंधरा रुग्ण
२३ दिवसात ९५६ तापाचे रुग्ण
जुलैच्या २३ दिवसांत विषाणूजन्य तापाने बाधित तब्बल ९५६ रूग्णांना इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये ४५० बालरूग्णांचा समावेश आहे. ही शासकीय आकडेवारी असून खासगी क्षेत्रातही हिच स्थिती आहे. शासकीय रूग्णालयांमध्ये ७६६ रूग्णांची तपासणी केल्यानंतर १८१ टायफॉईडबाधित रूग्ण आढळून आलेत.

वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य तापाचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेची काळजी, पोषक आहार घेणे, रोेगप्रतिकारक क्षमता वाढविणे गरजेचे आहे. योग्य काळजी घेऊनच बचाव करता येऊ शकतो.
-नीलेश पवार, बालरोगतज्ज्ञ

Web Title: baala-araogayaalaa-vaisaanauujanaya-taapaacaa-vailakhaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.