Bacchu adu : बच्चू कडू यांना २० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 10:47 AM2022-07-05T10:47:43+5:302022-07-05T10:55:30+5:30
आ. बच्चू कडू यांनी तापी नदीच्या मुद्यावरून मटकी फोडो आंदोलन केले होते.
अमरावती : माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अमरावती दौऱ्यावेळी केलेल्या आंदोलनामुळे आमदार बच्चू कडू यांना न्यायालयाने सोमवारी २० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
विलासराव देशमुख यांनी ८ मे २००२ रोजी अमरावती विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली होती. यावेळी आ. बच्चू कडू यांनी तापी नदीच्या मुद्यावरून मटकी फोडो आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली होती. गाडगेनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या प्रकरणात सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १ एस. एस. अडकर यांनी आ. बच्चू कडू यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. सुनील देशमुख यांनी युक्तिवाद केला.