बच्चू कडुंच्या मोर्चाने प्रशासन घामाघूम

By admin | Published: November 20, 2015 01:02 AM2015-11-20T01:02:16+5:302015-11-20T01:02:16+5:30

शहरातील मुख्य रस्त्यांवरून दुपारी मोटारसायकलींच्या न संपणाऱ्या रांगा धावत होत्या. विभागीय आयुक्तालयासमोर जाऊन त्या थांबल्यात.

Bachhu Kadu's Morcha administered by Ghamaghou | बच्चू कडुंच्या मोर्चाने प्रशासन घामाघूम

बच्चू कडुंच्या मोर्चाने प्रशासन घामाघूम

Next

पोलीसही हतबल : विभागीय आयुक्तालयचे दार तोडले, कार्यालयात फोडले फटाके
अमरावती : शहरातील मुख्य रस्त्यांवरून दुपारी मोटारसायकलींच्या न संपणाऱ्या रांगा धावत होत्या. विभागीय आयुक्तालयासमोर जाऊन त्या थांबल्यात. कडेकोट पोलीस बंदोबस्ताची दाणादाण उडवत हा लोकरेटा बॅरिकेटस् उधळून आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दाखल झाला. हाती प्रतिकात्मक भाले असणारी ही उत्साही गर्दी फटाके फोडून धमाल उडवून देत होती. इतक्यात मोठ्या गर्दीतून एक नेता मिनीडोअरवर उभा ठाकला आणि मग सुरू झालेले प्रशासनाला धडकी भरविणारे आंदोलनसत्र. मागण्या मंजुर होईस्तोवर रात्री उशिरापर्यंत ते सुरूच होते. अर्थातच प्रहारचे प्रमुख असलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकरीहितासाठी छेडलेला तो एल्गार होता!
जिल्ह्याची पेैसेवारी ५० पेक्षा कमी असल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, ऊसाच्या धरतीवर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ हजार रूपये रोख मदत देण्यात यावी, गरजू शेतकऱ्यांना तातडीने योग्य दाबाचा वीजपुरवठा देण्यात यावा,

Web Title: Bachhu Kadu's Morcha administered by Ghamaghou

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.