बच्चू कडू यांनी घेतला आगारचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:02 PM2017-11-11T23:02:40+5:302017-11-11T23:02:54+5:30
राज्य परिवहन मंडळ, विभागीय नियंत्रक अमरावती येथे आमदार बच्च कडू यांनी बैठक घेऊन, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : राज्य परिवहन मंडळ, विभागीय नियंत्रक अमरावती येथे आमदार बच्च कडू यांनी बैठक घेऊन, भंगार असलेल्या बसेस, चांदूर बाजार आगारातील ७ बसेस तसेच परतवाडा आगारातील ८ भंगार बसेस जमा करून त्याऐवजी नवीन बसेस सुरू करण्याचे आदेश दिले.
आदिवासी भागात घाटलाडकीहून बस जात नसल्यामुळे मोर्शीहून रेडवा, चिंचकुंभ या गावातून नवीन बसेस तत्काळ सुरू करण्याचे आदेश विभागीय नियंत्रक यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परतवाडा, बोरगाव-मोहना, तुळजापूर गढी, हिरूळपूर्णा, शहापूर, सर्फाबाद येथील सकाळच्या वेळेत दोन अतिरिक्त फेºया वाढविण्यास सांगितले. अपंगांच्या थांबून ठेवलेल्या पासेस देण्याचे आदेशही त्यांनी दिले. या वेळेनुसार बसेस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे.