भ्रष्टाचार दडपविण्यासाठी ‘बॅकडेटेड’ पत्रव्यवहार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:12 PM2018-05-24T22:12:19+5:302018-05-24T22:12:19+5:30

‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहनातील अनियमितता दडपविण्यासाठी महापालिका प्रशासानातील काही धेंड्यांनी वृथा खटाटोप चालविल्याचे उघड झाले आहे. आपली यात नाहक बदनामी होत असून याचा सूत्रधार मात्र नामानिराळा असल्याची प्रतिक्रिया पालिका प्रशासनात उमटली आहे.

'Backdated' correspondence for suppressing corruption! | भ्रष्टाचार दडपविण्यासाठी ‘बॅकडेटेड’ पत्रव्यवहार !

भ्रष्टाचार दडपविण्यासाठी ‘बॅकडेटेड’ पत्रव्यवहार !

googlenewsNext
ठळक मुद्देउपायुक्त कार्यालयाचा प्रताप : आवक जावक क्रमांकच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहनातील अनियमितता दडपविण्यासाठी महापालिका प्रशासानातील काही धेंड्यांनी वृथा खटाटोप चालविल्याचे उघड झाले आहे. आपली यात नाहक बदनामी होत असून याचा सूत्रधार मात्र नामानिराळा असल्याची प्रतिक्रिया पालिका प्रशासनात उमटली आहे. या संपूर्ण प्रकरणातील अनियमितता जगजाहीर होऊ नये, यासाठी बॅकडेटेड पत्रव्यवहार केल्याचा आरोप आहे.
२ कोटी ४ लाख रुपये किमतीच्या ‘मल्टियुटिलिटी फायर रेस्क्यू वाहनाचा १६ डिसेंबर २०१७ रोजी कंपनीकडून पुरवठा करण्यात आला. तशी नोंद साठा रजिस्टरमध्ये घेतल्याचा दावा अग्निशमण अधीक्षकांनी केला. त्यांनीच ते वाहन योग्य ठरविले. निविदा सूचनेतील अटी, शर्ती व तांत्रिक तपशिलानुसार वाहनाचा योग्य पुरवठा झाल्याने देयक मंजूर करावे, अशी नोटशिट अधीक्षकांनी चालविली. वरिष्ठ लिपिक भारतसिंग चौव्हान यांनी त्या वाहनाची स्पेशिफिकेशननुसार पडताळणी केली. त्यानंतर वाहनाचा पुरवठा योग्यरित्या झाल्याचे उपायुक्त नरेंद्र वानखडे व आयुक्त हेमंत पवार यांना सांगितले. व दुसऱ्याच दिवशी देयकाची फाईल हातोहात फिरवून निधी एंटरप्रायजेसला १.९४ कोटी रुपये अदा करण्यात कि रोल उठविला. दरम्यान वाहन खरेदीेच्या निविदाप्रक्रियेतच घोळ झाल्याने प्रक्रिया रद्द करावी , अशी तक्रार महापालिकेसह मुख्यमंत्री, नगरविकास विभाग व लोकायुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या चौव्हान यांनी उपायुक्तांशी संपर्क करत वाहनात बºयाच त्रुट्या असल्याचे सांगितले. त्यापूर्वीच वाहन योग्य ठरविल्याने अधीक्षकांची कोंडी झाली. त्यामुळे लगेचच ते वाहन सुधारणेसाठी निधी एंटरप्रायजेसकडे परत पाठविण्यात आले. मात्र, ते वाहन परत केव्हा पाठविण्यात आले, याबाबतची कुठलीही नोंद महापालिकेकडे नाही. ही बाब आता काल-परवा उघड झाल्यानंतर मागाहून निधी एंटरप्रायजेसला पत्र पाठविण्यात आल्याचा आरोप आहे.
अनियमितता दडपविण्यासाठी उपायुक्त आग्रही
अधीक्षक चौव्हान यांनी ते वाहन योग्य ठरविले. मात्र, त्या वाहनात त्रुट्या आढळल्या. स्पेशिफिकेशननुसार त्या वाहनात कंपोनंन्ट्स नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. मात्र, आता त्रुट्या म्हटल्यास चौव्हान अडकतील, असा विचार करण्यात आला. १६ डिसेंबरलाच उपायुक्त वानखडे यांनी निधी एंटरप्रयजेसला पत्राद्वारे वाहनात सुधारणा सुचविल्या. मात्र त्यास सुधारणेचा मुलामा चढविण्यात आला. या प्रकरणात वानखडेंनी चौव्हाण यांचा बचाव केला.
अधीक्षकच संशयात
१६ डिसेंबरला आलेले ते वाहन अधीक्षक चौव्हान यांनी योग्य ठरविले. देयक प्रस्तावित केले. १८ डिसेंबरला उपायुक्तांनी निधी एंटरप्रायजेसला पत्र लिहून त्या वाहनात अनेक सुधारणा सुचविल्या. मात्र १६ डिसेंबरला निधी एंटरप्रायजेसला सुधारणा सुचविणाºया पत्राला आवक जावक क्रमांक नाही. महापालिकेच्या कुढल्याही विभागात निधीला तसे पत्र गेल्याची नोंद नाही. विशेष म्हणजे १६ डिसेंबरच्या सायंकाळी वाहनाचा पुरवठा झाल्यानंतर त्याच दिवशी निधी एंटरप्रायजसेला सुधारणेचे पत्र पाठविण्यात आले. सोमवार १८ डिसेंबरला निधी एंटरप्रायजेसने महापालिकेला पत्र पाठवून वाहन परत मागविले. मात्र, त्या पत्राचीही महापालिकेच्या कुठल्याही विभागात नोंद नाही. त्यामुळे ते दोन्ही पत्र आता मागाहून जोडण्यात आल्याच्या आरोपाला दुजोरा मिळाला आहे.

Web Title: 'Backdated' correspondence for suppressing corruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.