‘बॅकडोअर एन्ट्री’चा प्रस्ताव माघारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:22 PM2018-07-30T22:22:14+5:302018-07-30T22:23:07+5:30
सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या स्थायी नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप सदस्यांवर काँग्रेसी सदस्यांनी दबाव आणून हा प्रस्ताव मागे घेण्यास बाध्य केल्याचे वास्तव उघड झाले आहे. बोंद्रे यांनी त्यांच्या गॉडफादरकरवी फिल्डिंग लावून नोकरी वाचविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होऊ लागली आहे.
Next
ठळक मुद्देराजकारण : भाजप सदस्यांवर दबाव कुणाचा, सत्ताधाऱ्यांची पारदर्शकता विरोधकांच्या दावणीला
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सहायक पशुशल्य चिकित्सक सचिन बोंद्रे यांच्या स्थायी नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय घेण्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. याप्रकरणी भाजप सदस्यांवर काँग्रेसी सदस्यांनी दबाव आणून हा प्रस्ताव मागे घेण्यास बाध्य केल्याचे वास्तव उघड झाले आहे. बोंद्रे यांनी त्यांच्या गॉडफादरकरवी फिल्डिंग लावून नोकरी वाचविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होऊ लागली आहे.
सचिन बोंद्रे यांच्या महापालिकेत आस्थापनेवरील नियुक्तीवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या या बॅकडोअर एन्ट्रीबाबत नगरविकास विभागाकडूनही चौकशी सुरू आहे. मात्र, जीएडीच्या अधिकाºयांनी बोंद्रेंना वाचविणारा अहवाल पाठविल्याने तूर्तास हे प्रकरण थंडबस्त्यात पडले आहे. नगरविकास विभागाच्या कक्ष अधिकाºयाने याबाबत आयुक्तांना वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अहवाल मागितला. मात्र प्रशासनाने ‘गोलगोल’ अहवाल पाठवून बोंद्रेंना अभय दिले. कुठलीही शासकीय जागा सेवाप्रवेश नियमानुसार भरली जाते. जाहिरात, समांतर आरक्षण, मुलाखती अशा सर्व टप्पे पार करणाºयांची नियुक्ती केली जाते. मात्र, सचिन बोंद्रेबाबत या नियमांना हरताळ फासण्यात आला. शासनाने सहायक पशूशल्य चिकित्सक या पदाला मान्यता दिल्यानंतर आमसभेतून बोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती चुकीची असल्याचे हेमंत पवार यांनीही अनौपचारिकरीत्या बोलताना स्पष्ट केले होते. मात्र, अहवाल पाठवताना त्यांनी आमसभेमधील नियुक्तीबाबत कुठलेही स्पष्ट मत दर्शविले नाही. या पार्श्वभूमिवर बोंद्रे यांच्या नियमबाह्य नियुक्तीबाबत भाजपचे गटनेता सुनील काळे, धीरज हिवसे आणि चेतन गावंडे यांनी प्रस्ताव दिला. १६ एप्रिल २०१८ च्या आमसभेतील विषयपत्रिकेमध्ये या प्रस्तावाचा अंतर्भाव आहे. बोंद्रेंच्या नियमबाह्य नियुक्तीबाबत चर्चा करून निर्णय झाल्यास अनियमितता चव्हाट्यावर येईल. बोंद्रेंची नियुक्ती नियमबाह्य ठरविल्यास सभागृहाची प्रतिमा मलिन होऊ शकते, असा डोज प्रस्तावधारकांना देण्यात आला. त्यामुळे जुलैच्या आमसभेपूर्वी बोंद्रेंबाबतचा प्रस्ताव माघारी घेण्यात आला. यात मोठे राजकारण करण्यात आले. पारदर्शक प्रशासनाचा शब्द देत भाजपने सत्ता काबीज केली. मात्र, बोंद्रे यांच्या नियमबाह्य नियुक्तीबाबतचा प्रस्ताव मागे घेऊन भाजपलाही बेकायदा प्रवेशलेले अधिकारी हवे आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आमसभेत चर्चा होऊन बोंद्रेंना काढण्याचा निर्णय झाल्यास यंत्रणा ढासळेल. तूर्तास बोंद्रेंना पर्याय उपलब्ध नाही. गुरा-ढोरांवरील कारवाईस ब्रेक लागल्यास ओरड झाली असती. त्यामुळे प्रस्ताव मागे घेतला.
- धीरज हिवसे,
नगरसेवक, भाजप
पशुवैद्यकीय विभागाची कारवाई ढेपाळली होती. मोकाट श्वान, वराहांच्या प्रश्नावर सभागृहात जाब विचारला जात होता. तथापि, आता बोंद्रेंनी कामास सुरूवात केली आहे. त्यामुळे प्रस्ताव मागे घेण्यात आला.
- चेतन गावंडे,
नगरसेवक, भाजप
सचिन बोंद्रेंविषयी सार्वत्रिक ओरड होती. महिला नगरसेविका अधिक आक्रमक होत्या. त्यामुळे प्रस्ताव टाकला. तथापि, आता बोंद्रेंनी कारवाईस सुरुवात केली आहे
- सुनील काळे,
सभागृहनेता, भाजप