परतवाडा आगारातील बसेस ‘हायटेक’, कॅमेरेही लागले

By admin | Published: April 5, 2017 12:12 AM2017-04-05T00:12:16+5:302017-04-05T00:12:16+5:30

एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजनाबरोबरच एसटीच्या उत्पादनात भर टाकण्यासाठी महामंडळाने गाड्यांमध्ये वाय-फाय बसविण्यास सुरुवात केली आहे.

Backward traffic buses 'Hi-tech', cameras also started | परतवाडा आगारातील बसेस ‘हायटेक’, कॅमेरेही लागले

परतवाडा आगारातील बसेस ‘हायटेक’, कॅमेरेही लागले

Next

उत्पन्नही वाढणार : राज्य परिवहन महामंडळाच्या निर्णयाने नागरिकांचा प्रवास सुकर
परतवाडा : एसटीचा प्रवास सुखकर, आनंददायी आणि मनोरंजनाबरोबरच एसटीच्या उत्पादनात भर टाकण्यासाठी महामंडळाने गाड्यांमध्ये वाय-फाय बसविण्यास सुरुवात केली आहे. परतवाडा आगारातील मेळघाटात जाणाऱ्या बसेसमध्ये वाय-फाय, तर ३ बसेसमध्ये कॅमेरा बसविण्यात आला आहे. १ एप्रिलपासून या बसेसच्या फेऱ्या सुरू असून या अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांचे मनोरंजन होत असले तरी एसटी महामंडळाचे उत्पन्नातही भर पडणार आहे. मेळघाटात धावणाऱ्या अधिक बसेसच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याने काही वाहक व चालक नेहमी प्रशासनाच्या संशयात राहत असे. काही चालक व वाहक जाणीवपूर्वक मेळघाटात फेरी लावण्याकरिता उत्सुक असते. आता या बसेसमध्ये कॅमेरा लागल्याने किती प्रवासी प्रवास करीत आहे याची नोंद घेतली जाईल. मेळघाटात धावणाऱ्या चिखलदरा-धारणी एमएच ४० एन ५२३६, परतवाडा-तुकईथड एमएच ४० एन ८९२४ या बसेसमध्ये तर नागपूर-इंदोर, नागपूर-भोकरबर्डी, दर्यापूर-भोकरबर्डी या बसेसमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही सुविधा मोफत असून राज्यभरातील १८ हजार बसेसवर कार्यान्वित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

लांब पल्ल्याच्या प्रवाशांना आनंद
महामंडळाने गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा दिल्याने प्रवाशांना मोबाईलमधील वाय-फाय सुविधा सुरू करून मराठी, हिंदी चित्रपट, गाणी, कार्टुन्स पाहता येईल. त्यामुळे लांब टप्प्यातील प्रवाश्यंना ही सुविधा दीर्घकाळापर्यंत घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे असे प्रवासी या सुविधेसाठी आनंदी असेल.

Web Title: Backward traffic buses 'Hi-tech', cameras also started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.