मेळघाटातील रस्ते खराब की चालक अप्रशिक्षित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:13 AM2021-04-20T04:13:14+5:302021-04-20T04:13:14+5:30
फोटो पी १९ धारणी ट्रक पान २ ची बॉटम परतवाडा : परतवाडा-धारणी-इंदूर मार्गावरील घटांगनजीक असलेल्या पिकनिक पॉईंटजवळ सोमवारी सकाळी ...
फोटो पी १९ धारणी ट्रक
पान २ ची बॉटम
परतवाडा : परतवाडा-धारणी-इंदूर मार्गावरील घटांगनजीक असलेल्या पिकनिक पॉईंटजवळ सोमवारी सकाळी ८ वाजता गहू घेऊन जाणारा ट्रक ५० फूट खोल दरीत कोसळला. या घटनेने सदर मार्गावर आठवड्यात एक अपघात होत असल्याने रस्ते खराब की चालक अप्रशिक्षित, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परतवाडा ते धारणी इंदूर हा आंतरराज्य महामार्ग आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहने मालवाहतूक करतात. मध्य प्रदेशातून होणारी मालवाहतूक राज्याच्या इतर भागात जाते. सदर मार्ग बिहाली ते हरिसालपर्यंत घाटवळणाचा असून, ठिकठिकाणी धोकादायक वळण आणि खोल दऱ्या आहेत. एकंदर जीवघेणा मार्ग असताना, या मार्गावरील रस्त्याचे काम व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटींमुळे थांबले आहे. परिणामी आठवड्यात एका मालवाहू ट्रक किंवा वाहनाचा अपघात होत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
उडी घेऊन चालकाने जीव वाचविला
सोमवारी सकाळी घटांग ते बिहाली दरम्यान असलेल्या पिकनिक पॉईंटजवळ खराब रस्त्यामुळे ट्रक पन्नास फूट खोल दरीत जात असल्याचे लक्षात येताच चालक व वाहकाने क्षणाचा विलंब न करता ट्रकमधून उडी भेट जीव वाचविल्याची माहिती आहे.