पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका, तीन तालुक्यात अतिवृष्टी; ३५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 27, 2023 07:30 PM2023-11-27T19:30:24+5:302023-11-27T19:31:13+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा व मेहकर या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली.

Bad weather hits West Vidarbha, heavy rains in three taluks Damage to crops in 35 thousand hectares |  पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका, तीन तालुक्यात अतिवृष्टी; ३५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

 पश्चिम विदर्भाला अवकाळीचा फटका, तीन तालुक्यात अतिवृष्टी; ३५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

अमरावती: विभागात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या वादळवाऱ्यासह अवकाळीचा बुलडाणा व वाशिम जिल्ह्यास चांगलाच फटका बसला आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा, देऊळगावराजा व मेहकर या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली. २४ तासांत विभागात सरासरी ३३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या आपत्तीमध्ये वाशिम जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. याशिवाय अकोला जिल्ह्यात ८, बुलडाणा जिल्ह्यात ८६ व वाशिम जिल्ह्यात ९१ शेळ्या-मेंढ्या व एक बैल असे एकूण १८५ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यात ५२ व वाशिम जिल्ह्यात १ अशा एकूण ५३ घरांची पडझड झाली.

या आपत्तीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ३३,९५१ हेक्टरमधील कपाशी, तूर, फळपिके, ज्वारी व भाजीपाला तसेच वाशिम जिल्ह्यात ४०२ हेक्टरमधील कपाशीचे नुकसान झाल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे. या २४ तासात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५४.५ मिमी, वाशिम ५०.५, अकोला २८.४, यवतमाळ २७.२ व अमरावती जिल्ह्यात १३.८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
 

Web Title: Bad weather hits West Vidarbha, heavy rains in three taluks Damage to crops in 35 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.