बडनेरा रेल्वे वॅगन दुरूस्तीच्या कामाला प्रारंभ
By admin | Published: May 5, 2017 12:21 AM2017-05-05T00:21:42+5:302017-05-05T00:21:42+5:30
बडनेरा रेल्वे वॅगन रिपेरिंग वर्कशॉप प्रोजेक्टच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी
वास्तूनिर्मितीचा आढावा : मुहूर्त साधला, ३१६ कोटींचा प्रकल्प
अमरावती : बडनेरा रेल्वे वॅगन रिपेरिंग वर्कशॉप प्रोजेक्टच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामाची प्रत्यक्ष पाहणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली. वर्कशॉप प्रोजेक्ट इंजिनिअर व कामगारांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून प्रकल्पाच्या वास्तुनिर्मितीचा आढावा घेण्यात आला.
सुमारे २०१०-११ च्या रेल्वे बजेटमध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केलेल्या २४७.५७ कोटी रुपयांच्या वॅगन रिपेरिंग फॅक्टरी प्रोजेक्टचा कंत्राटदारांच्या न्यायालयीन वादविवादामुळे रखडला होता. या वादविवादावर मार्ग काढून सुधारित अंदाजपत्रक रेल्वे मंत्रालयास खा. आनंदराव अडसूळ यांनी सादर करून ३१६.१० कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळवून घेतली व त्यानंतर झालेल्या निविदा प्रक्रियेअंती कलकत्ता (पश्चिम बंगाल) व गुजरात येथील वापी येथील कंत्राटदारांची निविदा मंजूर झाल्यामुळे सदर कामास वेग देण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष कामास सुरूवात करावी, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ यांनी केली व आज रोजी सदर कामास १९२.४७ एकरावर प्रकल्प उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरील व्हॅगन फॅक्टरीच्या स्थळाला प्रत्यक्ष भेट देवून वळविण्यात येणाऱ्या काटआमला रस्त्याची पाहणी तसेच उभारण्यात येणाऱ्या वर्कशेड स्थळाची पाहणी व नकाशाद्वारे प्रकल्प उभारणीचा आराखडा खा. अडसूळ यांनी समजून घेतला. यावेळी पटणा बिहार येथून वर्कशॉप प्रोजेक्ट डिव्हीजनच्या अभियंत्याची भेट घेवून दीड वर्षात प्रकल्प पूर्ण होईल.