बाबाद्दीनच्या वरली अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 10:33 PM2018-04-18T22:33:19+5:302018-04-18T22:33:39+5:30

बाबाद्दीनच्या पठाण चौकातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचा ९० हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात ही धडाकेबाज कारवाई बुधवारी दुपारी १.३० वाजता करण्यात आली.

Badauddin toppling | बाबाद्दीनच्या वरली अड्ड्यावर धाड

बाबाद्दीनच्या वरली अड्ड्यावर धाड

googlenewsNext
ठळक मुद्दे'सोरट'चाही खेळ : १२ अटके त, ९० हजारांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बाबाद्दीनच्या पठाण चौकातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचा ९० हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात ही धडाकेबाज कारवाई बुधवारी दुपारी १.३० वाजता करण्यात आली.
विशेष म्हणजे, लहान मुलांसाठी 'सोरट' हा जुगार या अड्ड्यावर सुरू असल्याचेही घटनास्थळाहून जप्त चिठ्ठीवरून स्पष्ट झाले आहे. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात एपीआय रवि राठोड, शिपाई विनोद चव्हाण, किटकुले, राहुल वंजारी यांच्यासह नागपुरी गेटचे प्रभारी निरीक्षक अविनाश कौवटेकर, पीएसआय अविनाश मेश्राम, प्रशांत लभाने, भारती इंगोले, शिपाई वारीस तायडे, शरद धुर्वे, बाळू ठाकरे, संदीप विजयकर, सतीश लोहकरे व किशोर धुर्वे यांनी गोपनीय माहितीवरून सापळा रचून पठाण चौकातील बाबाद्दीन बदरोेद्दीन (४५, रा. कमेला ग्राऊंड) याच्या वरली-मटका धंद्यावर धाड टाकली. पोलिसांनी पाहून जुगार खेळणाऱ्यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांनी पाठलाग करून बाबाद्दीनसह १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६३ हजार ९५ रुपये रोख, आठ हजारांचे सात मोबाइल, जुगार साहित्य व इतर वस्तू असा एकूण ९० हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
बाबाद्दीनला व्हीआयपी ट्रीटमेंट
पोलिसांना बाबाद्दीनच्या अड्ड्यावर वरली-मटका, पत्त्यांचा क्लब व सोरट असा विविध प्रकारचा जुगार सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम १२ (अ), ४, ५, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. सायंकाळी सर्व आरोपींना जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. यामध्ये बाबाद्दीनला व्हीआयपी ट्रिटमेंट देत पोलीस जीपमध्ये आणल्या गेले, तर अन्य आरोपींना पोलिसांच्या व्हॅनमधून आणले गेले.
आरोपींमध्ये याचा समावेश : पोलिसांनी जुगार अड्ड्यावरून बाबाद्दीन बदरोद्दीन, सैयद शफीक सै. असगर (५०,रा. कमेला ग्राऊंड), संदीप गोपीलाल गुप्ता (३५, रा. मसानगंज), शेख बशीर शेख चांद (५५, रा. पाटीपुरा), हमीद खां हबी खां (४०, रा. जमील कॉलनी), नुरोद्दीन निजामोद्दीन (२९, रा. नागपुरी गेट), महेश नेमनदास केसवानी (२२, रा. नवी वस्ती, बडनेरा), मोहम्मद साजीद मो. साबीर (२७, रा. हैदरपुरा), विष्णू हरिभाऊ केवदे (५५, रा. हनुमाननगर), अब्दुल शाहीद अ. जमील (३०, रा. जाकीर कॉलनी), शेख इरशाद शेख मुजफ्फर (३०, रा. पठाण चौक) व शेख अकील शेख चांद (४५, रा. छायानगर) यांना अटक केली आहे.
काय आहे सोरट? : इझी मनी मिळण्यासाठी सोरट खेळाचा वापर जुगारी करतात. एका कागदावर चिठ्ठ्या चिकटवून ठेवलेल्या असतात. त्यापैकी एक विकत घेऊन उघडून पाहिल्यास, त्यावर पैसे किंवा एखादी बक्षीस स्वरूपात वस्तूचे चित्र दिले असते. हा खेळ लहान मुलांमध्ये प्रचलीत आहे. तो एकाप्रकारे जुगारात मोडतो.

बारा आरोपींना ताब्यात घेतले असून, मुद्देमाल जप्त केला आहे. तेथे सोरट खेळाच्या चिठ्ठ्याही आढळल्या. लहान मुलांना जुगाराकडे वळविण्यासाठी या खेळाचा उपयोग होत असल्याची शक्यता आहे.
चिन्मय पंडित,
पोलीस उपायुक्त.

Web Title: Badauddin toppling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.