शोकसागरात बुडाले वडनेरगंगाई
By admin | Published: August 24, 2015 12:25 AM2015-08-24T00:25:53+5:302015-08-24T00:25:53+5:30
घरी जेवण व इतर कामे केल्यानंतर त्यांनी वडनेरंगाईपासून तीन किलोमीटर असलेल्या बोर्डी नदीपात्रातील तत्कालिक खोलापुरी बंधाऱ्यापासून २०० फुटापर्यंत ...
वडनेर गंगाई : घरी जेवण व इतर कामे केल्यानंतर त्यांनी वडनेरंगाईपासून तीन किलोमीटर असलेल्या बोर्डी नदीपात्रातील तत्कालिक खोलापुरी बंधाऱ्यापासून २०० फुटापर्यंत अंतरावर असलेल्या पात्रातील डोहात पोहण्याचा बेत आखला. पिंपळोद ते राजखेड पाऊलवाट असलेल्या रस्त्याजवळील बोर्डी नदीपात्रात अभिजित बडोले यांच्या शेतानजीक भलामोठा डोह आहे. या ठिकाणी १५ फूट खोल पाणी असल्याचे गावकरी सांगतात. अगोदर कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ त्यांनी पोहण्याचा बेत आखल्याचे समजते. परंतु तेथे समाधान न झाल्याने तेथून जवळच असलेल्या पात्रात ते पोहण्यासाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने व आजूबाजूला कोणीही नसल्याने ते तिघेही दुपारी २ ते ४ दरम्यान बुडाले. विद्यार्थी घरी उशिरापर्यंत परत न आल्याने लोकांना शंका आली. त्यामुळे शोधाशोध केली असता पोहण्यापूर्वी त्यांनी कपडे व एका विद्यार्थ्याने कडे काढून ठेवले होते. त्यावरून या ठिकाणी विद्यार्थी डुबले असावे या अंदाजाने शोधाशोध सुरू झाली. दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे तसेच ग्रामसेवक भांबुरकर व तलाठी व नैसर्गिक आपत्ती विभागाचे कर्मचाऱ्यांनी व गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्याची मोहीम चालली. या ठिकाणी पट्टीचे पोहणारे संतोष भारसाकळे, प्रभुदास पवार, आकाश पवार, जवाहर पवार, निळू देशमुख व अशोक चव्हाण यांनी जॅकेट घालून शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत ऋतिकला एक मोठी बहीण असून त्याचे वडील शेतकरी आहे. मृत आकाश इंगळेला मोठ्या तीन बहिणी व एक मोठा भाऊ असून त्याचेही वडील शेतकरी आहेत. त्याची मोठी बहीण पूनमचे दीड वर्षांपूर्वी निधन झाल्याने त्यांचे कुटुंब अगोदरच हवालदिल झाले होते. मृतक आकाश हिवराळे मोलमजुरी करीत असून त्याला एक मोठा भाऊ आहे. अंत्ययात्रेला आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, गावचे सरपंच प्रदीप देशमुख, रमेश जोध तसेच अनेक पुढारी व नागरिक उपस्थित होते.
फलक लावले जाईल
सदर घटना ही बोर्डी नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यातून २०० फूट अंतरावर घडली. या ठिकाणी ग्रामपंचायतीच्यावतीने फलक लावण्यात येईल व त्याबाबत उपायोजना करण्यात येईल. गावात अशा प्रकारची पहिलीच घटना घडली आहे.