बडनेऱ्यात सहायक आयुक्तांनी केले कारवाई पथकाचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:14 AM2021-02-25T04:14:53+5:302021-02-25T04:14:53+5:30
बडनेरा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका झोन क्रमांक ४ च्या सहायक आयुक्त पथकाचे नेतृत्व करीत लॉकडाऊनसंबंधी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक ...
बडनेरा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महापालिका झोन क्रमांक ४ च्या सहायक आयुक्त पथकाचे नेतृत्व करीत लॉकडाऊनसंबंधी नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत.
अमरावती महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्याची साखळी तोडण्यासाठी दोन दिवसांपासून मनपा झोन क्रमांक ४ च्या सहायक आयुक्त भाग्यश्री बोरेकर या स्वास्थ्य निरीक्षक एकनाथ कुलकर्णी, ढिक्याव, सतीश राठोड अभियंता सुमित पाटील ईतर कर्मचाऱ्यांमध्ये राम समुद्रे, राजू बगन, प्रवीण पवार, बाळू उसरे याच्यासमवेत विनामास्क नागरिक व नियम न पाळणाऱ्या दुकानदारांना दंडित करीत आहेत. या पथकाने साडेचार हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. बडनेरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंजाब वंजारी हेदेखील गस्त करीत आहेत.