बडनेरा जुनी वस्ती, नवी वस्तींना जोडणाऱ्या पादचारी पूल निर्मितीसाठी सर्वेक्षण हॊणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:10 AM2021-06-17T04:10:40+5:302021-06-17T04:10:40+5:30
अमरावती : भुसावळ रेल्वेच्या एडीआरएम मनोज कुमार सिन्हा हे नवी वस्ती व जुनी वस्तींना जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी स्पॉट व्हिजिट ...
अमरावती : भुसावळ रेल्वेच्या एडीआरएम मनोज कुमार सिन्हा हे नवी वस्ती व जुनी वस्तींना जोडणाऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी स्पॉट व्हिजिट करून स्थळनिश्चिती करणार आहे. त्यामुळे हजारो शाळकरी विद्यार्थी, जुनी वस्ती-नवी वस्ती येथील रहिवासी यांचा फेरा वाचणार आहे. वेळ पैसे व श्रमाची बचत होऊन त्यांना रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूने आवागमन करणे सोपे होणार आहे.
रेल्वेने आपल्या हद्दीत भिंत बांधून सील केल्यामुळे बडनेराचे दोन्ही भाग विभक्त झाले. यामुळे दोन्ही भागातील नागरिकांना जुनी वस्ती, नवी वस्तीत ये-जा करण्यास अत्यंत गर्दीच्या पुलावरून जीव धोक्यात टाकून फेऱ्याने जावे लागत आहे. ही व्यथा खासदार नवनीत राणा व आमदार रवि राणा यांच्या पत्राद्वारा भुसावळ मंडळ प्रबंधक विवेक गुप्ता यांना कळवून युवा स्वाभिमान शिष्टमंडळाने बडनेरा दौऱ्यात सदर मागणी केली होती. यावेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, झेड आर.यूसीसी सदस्य अजय जयस्वाल, नानकराम नेभनानी, डीआरयूसीसी सदस्य नितीन बोरेकर, प्रवीण सावळे, विलास वाडेकर, अफताब खान, आयुब, उमेश ढोणे, अवि काळे, मंगेश कोकाटे, पवन हिंगणे, सिदार्थ बनसोड, अजय बोबडे, आकाश राजगुरे यांचा समावेश होता.