बडनेऱ्याची लढत चौरंगीहून तिरंगी ? रवी राणा, प्रीती बंड, तुषार भारतीय यांच्यात काट्याची लढाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:25 AM2024-11-14T11:25:52+5:302024-11-14T11:26:50+5:30

Amravati : सर्वच उमेदवारांची बोधचिन्हे नवी, राणांचा विजयी चौकार की नवा चेहरा?

Badnera's fight from four to three? Battle between Ravi Rana, Preeti Bund, Tushar Bharatiya! | बडनेऱ्याची लढत चौरंगीहून तिरंगी ? रवी राणा, प्रीती बंड, तुषार भारतीय यांच्यात काट्याची लढाई!

Badnera's fight from four to three? Battle between Ravi Rana, Preeti Bund, Tushar Bharatiya!

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
गेल्या १५ वर्षांपासून बडनेऱ्याची जागा जिंकून आमदारकीची हॅटट्रिक साधणारे अपक्ष आमदार रवी राणा हे चौथ्यांदा विजयाचा चौकार लगावण्यासाठी सर्वशक्तीनिशी रणमैदानात उतरले आहेत.


सोबतच, शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी सुनील खराटे यांना गेल्याने सन २०१९ मध्ये ४० टक्के मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रीती बंड या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, तर भाजपच्या तिकिटासाठी आग्रही असलेले तुषार भारतीय यांनी अपक्ष म्हणून नामांकन कायम ठेवत बडनेऱ्याची लढत तिरंगी केली आहे. गेल्या १५ वर्षात मतदारसंघात केलेली विकासकामे, इझी अॅव्हेलिबिलिटी, आश्वासक चेहरा व अफाट जनसंपर्कासोबतच महायुतीची साथ विद्यमान आमदार रवी राणा यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. बसपा व वंचितचा फारसा प्रभाव अद्यापपर्यंत तरी यंदा दिसलेला नाही. 


लोकसभेवेळी आ. रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा यांना तब्बल १,००,१२४ मते पडली होती. अर्थात आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत यांना तब्बल २६ हजार ७६३ चे मताधिक्य दिले होते. त्यावेळी राणा यांच्यासमवेत भाजप व शिंदेसेना होती. विधानसभेत देखील भाजप व शिंदेसेनेचा रवी राणा यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपची मते नेमकी कुणाच्या पारड्यात पडतात, यावर महायुतीच्या उमेदवाराचे यशापयश ठरेल. खासदार बळवंत वानखडे यांना बडनेरा मतदारसंघातून ७३ हजार ३६१ मते मिळाली होती. त्यावेळी उद्धवसेना व राकाँ (एसपी) त्यांच्यासोबत होती. त्यावेळी उद्धवसेनेच्या प्रीती बंड यांनी वानखडे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. मात्र, उमेदवारी ऐनवेळी खराटे यांच्याकडे गेल्याने उद्धवसेनेची मते विभागली जाण्याची दाट शक्यता आहे. सन २०१४ मध्ये भाजपचे तिकीट ऐनवेळी घोषित झाल्यानंतरही तुषार भारतीय यांनी तब्बल ३१,४५५ मते घेतली होती. त्यानंतर गेली दहा वर्षे भारतीय यांनी बडनेरा मतदारसंघाशी जुळलेली नाळ कायम ठेवली. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या तुषार भारतीय यांची उमेदवारी दखलनीय ठरली आहे. स्थानिक भाजपसह जुण्या जाणत्या भाजपाईची भूमिकादेखील रवी राणा व तुषार भारतीय या दोघांसाठी देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.


महायुती, आघाडीच्या मित्रपक्षांकडेही लक्ष, युतीधर्म पाळणार? 
भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट हे प्रमुख पक्ष असलेल्या महायुतीने बडनेयाची जागा युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवि राणा यांच्यासाठी सोडली आहे. त्यामुळे ते महायुतीचे संयुक्त उमेदवार ठरले आहेत. तर सुनिल खराटे यांच्यासोबत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार हे मुख्य घटक पक्ष आहेत. त्यामुळे या घटकपक्षांवरही या दोन्ही उमेदवारांची भिस्त असेल. तर दुसरीकडे, प्रिती बंड यांच्यासाठी अनेक अनामिक हात पुढे सरसावल्याचे चित्र आहे. भाजपचे बंडखोर ज्या मुशी घडले, त्या जुन्या जाणत्या व केंडर बेस व्होटिंगवरही यशापयश ठरणार आहे.

Web Title: Badnera's fight from four to three? Battle between Ravi Rana, Preeti Bund, Tushar Bharatiya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.