बहिरमचा काशी तलाव पुनर्जीवनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:15 PM2018-01-10T23:15:45+5:302018-01-10T23:17:14+5:30

तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे.

Bahiram Kashi lake waiting for the resurrection | बहिरमचा काशी तलाव पुनर्जीवनाच्या प्रतीक्षेत

बहिरमचा काशी तलाव पुनर्जीवनाच्या प्रतीक्षेत

Next
ठळक मुद्देपात्र कोरडेच : शासन उदासीन, लोकप्रतिनिधींची डोळेझाक

आॅनलाईन लोकमत
चांदूर बाजार : तालुक्यातील बहिरमबुवा यात्रा ही ऐतिहासिक यात्रा असून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे यात्रेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक काशी तलाव शेवटच्या घटका मोजत आहे. शासनाचा नाला खोलीकरण, शेततळे या योजनेअंतर्गत काशी तलावाचे पुनर्जीवन केल्यास इतिहासाची साक्ष देणाऱ्या तलावाचे वैभव वाचू शकते.
सातपुड्याच्या कुशीत वसलेले लाखो कुटुंबांचे कुलदैवत बहिमरबुवा असून महाराष्ट्रासह परप्रांतीय भाविक या यात्रेत सहभागी होतात. भगवान शंकर व पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते. त्यावेळी निसर्गाच्या कुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले होते. त्यामुळे पार्वतीने शंकराला येथे दरवर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने माझा एक अंश नेहमीसाठीच येथे ठेवतो, अशी आख्यायिका आहे. भगवान शंकराचे ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. पूर्वी हे तलाव भाविकांची तहाण भागवित होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे याकडे दुर्लक्ष होत आहे.
काशी तलावात ॠ षींचा मुक्काम
सातपुडा पर्वतातून वाहणाऱ्या पावसाच्या धारा या जंगलात असणाऱ्या वनऔषधीसोबतच येथील कशी तलावात पाणी जमा व्हायचे. काशीतलावाच्या चारही बाजूला सीताफळ, चंदनाचे मोठे वन आहे. अनेक वनऔषधीसुद्धा या जंगलात आढळतात. काशी तालवासंदर्भात पुराणातही दाखला मिळतो. ॠ षी विश्वामित्र, दुर्वासा व मार्तंड यांनी येथे तीन, सात व चार दिवस मुक्काम केला होता. आज या तलावात पाणी नसले तरीदेखील भाविकांच्या मनात तलावाविषयी श्रद्धा आहे.
ब्रिटिशकाळात झाले संवर्धन
यात्रेकरूंची तहान मागविणारा काशी तलावात आज पूर्णत: कोरडा पडला आहे. इंग्रजांना या तलावाचे महत्त्व पटल्याने ब्रिटिशकाळात या तलावाचे संवर्धन करण्यात आले. मात्र, इतिहासाची साक्ष असलेला हा काशी तलाव आजही उपेक्षितच आहे. चांदूर बाजारचे तत्कालीन गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे यांनी काशी तलावाला पुनर्जीवन देण्याचा निर्धार केला होता. या ठिकाणी पर्यटनाच्या हेतुने बोटिंग, मासेमारीसारखे अनेक उद्योग चांगल्या तºहेने सुरू करता येत असल्याची कल्पना मांडली होती.

जिल्हा परिषदेने या ऐतिहासिक काशीतलावात नियोजनबद्ध सुशोभीकरण केल्यास निसर्गाच्या सानिध्यातील हा काशी तलाव मोठे पर्यटनस्थळ बनू शकतो. याकरिता लवकरच शासनस्तरावर मागणी करणार आहे.
- नितीन टाकरखेडे, उपसभापती, पंचायत समिती

Web Title: Bahiram Kashi lake waiting for the resurrection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.