रोडगे, वांग्याची भाजी आणि हंडीचा सुगंध दरवळणार; अमरावती जिल्ह्यात बहिरम यात्रा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:27 AM2017-12-21T11:27:55+5:302017-12-21T11:28:59+5:30
राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र्र चौधरी यांनी पूजा केल्यानंतर यात्रा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली.
आॅनलाईन लोकमत
अमरावती: राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र्र चौधरी यांनी पूजा केल्यानंतर यात्रा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली. यासोबतच येथे रोडगे, वांग्याची भाजी व हंडीचा सुंगध दरवळण्यास सुरुवात झाली.
परतवाडा-बैतुल आंतरराज्यीय महामार्गावर वसलेल्या बहिरमबुवा यात्रा २० डिसेंबरपासून सुरू झाली. ती ३१ जानेवारीपर्यंत चालाणार आहे. दरम्यान १० लाखांवर भाविक यात्रेत हजेरी लावणार आहेत. येथील बाजारात विविध सजावटी वस्तू, शेतीपयोगी साहित्य, कापड, मातीची भांडी, टुरिंग टॉकिज, झुले, आभुषणे, हॉटेल्स आदी दुकाने लागतील. अमरावती, परतवाडा, बैतुल, भैसदेही, अकोला, नागपूर, जळगावसह राज्याच्या विविध भागांतील भाविक यात्रेत सहभागी होणार आहेत.
यात्रेदरम्यान जिल्हा परिषदेची सभा
बहिरम यात्रा राज्यासह मध्यप्रदेशात प्रसिद्ध आहे. पूर्वी कुटुंबासह बहिरमबुवासमोर नवस फेडला जात होता. येथे रोडगे, वांग्याची भाजी बनविण्याची प्रथा आजसुद्धा सुरू आहे. झेडपीची एक मासिक सभा आणि सामूहिक भोजन येथे सदस्य अधिकाऱ्यांसाठी दरवर्षी आयोजित केली जाते.
राहुटीसह मटणाची हंडी
बहिरमबुवांचा प्रसाद मुरमुरे रेवडी फुटाणे असून यात्रेदरम्यान येथे किमान चार लाखांवर नारळ फुटतात. मात्र अनेक वर्षांपासून तेथे मातीच्या हंडीत मटणाचा स्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागरिक लिलावात जागा घेऊन त्यावर टेंट लाहून राहुटी उभारतात आणि दरदिवशी भाड्याने दिली जाते.
बुधवारपासून बहिरम यात्रेला विधिवत पूजा अर्चा करून सुरुवात करण्यात आली. महिनाभर चालणाऱ्यां यात्रेत दहा लाखांवर भाविक येण्याचा अंदाज असून त्यासाठी मंदिर प्रशासनाने संपूर्ण तयारी चालविली आहे.
विधिवत पूजनाने यात्रेला सुरुवात
बहिरम यात्रेला बुधवारपासून विधिवत सुरुवात झाली. नऊ ब्राह्मणांच्या हस्ते अध्यक्ष सुरेंद्र चोधारी यांनी पूजाअर्चा केली. यावेळी संस्थानचे भास्करराव मानकर, प्रकाश ठाकरे, प्रेम चौधरी, किशोर ठाकरे, सुरेश ठाकरे, ड्रा. राजेश उभाड, अनिल कडू ,विठुभाऊ चिलाटे, अमर चौधरी पंजाबराव कविटकर आदी नागरिक, दुकानदार आदी उपस्थित होते.
- सुरेंद्र चौधरी,
अध्यक्ष, बहिरम संस्थान बहिरम