सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र

By जितेंद्र दखने | Published: September 12, 2022 06:00 PM2022-09-12T18:00:36+5:302022-09-13T10:36:38+5:30

महिला व बाल विकास विभाग आणि नरेगाच्या माध्यमातून दर्यापूर तालुक्यातील सामदा या गावात साकारण्यात आलेली बाला अंगणवाडी ही अंगणवाडी जिल्ह्यासाठी पॅटर्न ठरली आहे.

Bala Anganwadi in samda become a model pattern for Amravati; An innovative Anganwadi centre initiated by CEOs | सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र

सामदा येथील 'बाला' अंगणवाडी ठरलेय अमरावती मॉडेल; सीईओंच्या पुढाकाराने साकारले नवीन्यपूर्ण केंद्र

googlenewsNext

अमरावती : गोंधळ या बंदिस्त खोलीत अंगणवाडी ही संकल्पना आता बदलली असून जणूकाही घरीच असल्याची भावना निर्माण करणाऱ्या आदर्श अंगणवाडी जिल्ह्यात आकारास आली आहे त्याची सुरुवात दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील बाला अंगणवाडीने झाली आहे. ही अंगणवाडी जिल्ह्यासाठी मॉडेल ठरली आहे.

महिला व बाल विकास विभाग आणि नरेगाच्या माध्यमातून दर्यापूर तालुक्यातील सामदा या गावात साकारण्यात आलेली बाला अंगणवाडी ही अंगणवाडी जिल्ह्यासाठी पॅटर्न ठरली आहे. झेडपीचे सीईओ अविष्यांत पंडा यांच्या पुढाकारातून अंगणवाडीचे रुपडेच पालटले आहे. बाला अंगणवाडीमध्ये आज प्रवेश करताना स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आपले लक्ष वेधते. आतील बाजूला आरोग्य तपासणी कक्ष असून त्यामध्ये बाळाचे वजन मोजण्यासाठी वजन काटा बालकांच्या तपासासाठी टेबल व अन्य सुविधा आहेत.

विशेष म्हणजे अंगणवाडी केंद्रातील प्रत्येक भिंत जणू बोलकी भिंत बनली आहे. प्रत्येक भिंतीवरील कार्टून चिमुकल्यांना आकर्षित करतात. पशुपक्षी फळांची छायाचित्रे भिंतीवर साकारण्यात आली असून चिमुकल्यांना कौटुंबिक वातावरण माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या आणि नव्या अंगणवाडी केंद्रातील मुख्यत: जो फरक आहे तो म्हणजे ॲक्टिव्हिटी रूम, बालकेंद्री आहे. अंगणवाडी केंद्र, प्रशस्त खिडकी, वेगळे शौचालय, हात धुण्यासाठी बेसिन, तपासणी कक्षही आहे. यासह अंगणवाडी केंद्रमध्ये ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी चालतात त्यासाठी बालकांना ॲक्टिव्हिटी करताना त्रास होऊ नये यासाठी वेगळा आरोग्य तपासणी कक्षसुद्धा आहे. युनिसेफचे आर्किटेक संदीप पुणतांबेकर यांची टेक्निकल मदत घेण्यात आली. ही इमारत साकारली आहे. नरेगा अंतर्गत १५ लाखाच्या निधीतून इमारतीचे १०० टक्के बांधकाम पूर्ण केले.

निसर्ग संपन्न अंगणवाडी

या अंगणवाडी केंद्रात अ आ इ ई किंवा एबीसीडीच नव्हे तर नदी, धबधबे, बगीचा मन मोहून टाकणारे फुलझाडे विविध प्रकारची खेळणी आदींची छायाचित्रे भिंतीवर रंगविण्यात आल्याने खऱ्या अर्थाने चिमुकल्यांसाठी बाला अंगणवाडी केंद्र कुटुंबासारखे वाटत आहे.

अशा आहेत सुविधा

या अंगणवाडी केंद्रामध्ये  सोलर पॅनल, दूरदर्शन संच, स्मार्ट अंगणवाडी किट, बालकांसाठी खेळणी तर बसण्यासाठी टेबल या सर्व बाबी उपलब्ध असल्यामुळे अंगणवाडी केंद्र एकदम बालकांसाठी बालकेंद्री अंगणवाडी केंद्र म्हणून उदयास आलेले आहे.

बालकांसाठी प्रशस्त अंगणवाडी केंद्र असावे संकल्पनेतून युनिसेफची विशेष तांत्रिक मदत घेऊन अंगणवाडी बांधकाम करण्याचा माझा मानस होता. यामध्ये नरेगाचा शंभर टक्के निधी वापरून अंगणवाडी केंद्र साकारले आहे.येत्या काही दिवसात ६० पैकी ३५ अंगणवाडी केंद्र बालकांसाठी तयार होतील.

अविष्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: Bala Anganwadi in samda become a model pattern for Amravati; An innovative Anganwadi centre initiated by CEOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.