वडाळी निसर्ग पर्यटन क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2022 05:00 AM2022-02-18T05:00:00+5:302022-02-18T05:00:57+5:30
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. शासननिर्णयानुसार २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तथापि, शासनाकडून अद्यापपर्यंत निधी प्राप्त झालेला नाही. तो उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या स्थळाच्या विकासकामांना चालना मिळेल, अशी विनंती पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रातील वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्मितासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे तसेच या स्थळाला ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. शासननिर्णयानुसार २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तथापि, शासनाकडून अद्यापपर्यंत निधी प्राप्त झालेला नाही. तो उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या स्थळाच्या विकासकामांना चालना मिळेल, अशी विनंती पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रस्तावित वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन स्थळाला ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देऊन आगामी अधिवेशनात त्याबाबत घोषणा करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.