खरीपपूर्व लागवडीसाठी बळीराजा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:18+5:302021-05-18T04:13:18+5:30
चांदूर बाजार : देशभरात सध्या कोरोना विषाणूचे संकट सुरू आहे. कोरोनाच्या संकटात बळीराजाने हंगामपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. दररोजचे ...
चांदूर बाजार : देशभरात सध्या कोरोना विषाणूचे संकट सुरू आहे. कोरोनाच्या संकटात बळीराजाने हंगामपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. दररोजचे ढगाळ वातावरण पाहता, खरीपपूर्व लागवडीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे.
खरिपाची सुरुवात मे महिन्यापासून होते. यामुळे मशागतीची कामे बळीराजाला मे महिन्यातच उरकवावी लागतात. मे महिना हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या महिन्यातच बळीराजा आपली पुढील हंगामाची आखणी करून बियाणे खरेदीसह इतर किरकोळ कामे पूर्ण करीत असतो. शेवटच्या आठवड्यात रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बळीराजाचा व्यस्त कार्यक्रम असतो. या कालावधीत त्याला शेतीपूरक कामे व नियोजनाची जुळवाजुळव करावी लागते. अशातच रोहिणी नक्षत्रानंतर बळीराजा हंगामाच्या मशागतीपासून इतर कामांना गती देत असतो. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हामध्ये शेतातील कामे सध्या मोठ्या जोमात सुरू आहेत. अशातच पुढील हंगामातील नियोजनानुसार बियाणे बूकिंग करावे लागते. या कालावधीत बियाणे कोणती विकत घेऊन लागवड करावी, याचासुद्धा अभ्यास करावा लागतो.
सध्या कोरोनाचे संकट देशापुढे उभे आहे. याचे पडसाद शहरांसह ग्रामीण भागातसुद्धा बघावयास मिळत आहे. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होण्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. तरीही अशा संकटकाळात बळीराजज्जिवाची पर्वा न करता आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम तोंडावर असला तरी सध्या दिवसा उष्णतेचा कहर, तर सायंकाळी व रात्री पावसाचा कहर सुरू असल्याने शेतकरी सकाळच्या सुमारास शेतात जाऊन कामाला महत्त्व देत आहे.
पावसाची र्वदी
रोहिणी नक्षत्राला १५ दिवसानंतर प्रारंभ होणार असला तरी भर उन्हाळाच्या ऋतूत अवकाळी पावसाच्या गारपिटीचा व वादळ वाऱ्याचा कहर सुरू असल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. परंतु आलेल्या संकटाशी सामना करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. निसर्गाच्या वक्रदृष्टीने वेगवेगळे संकट झेलताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असले तरी नव्या दमाने व हिमतीने पुन्हा शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज झालेला आहे.