धूलिकण कमी करण्यास गिट्टीची मलमपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:25 PM2017-11-04T23:25:01+5:302017-11-04T23:25:23+5:30
राजापेठ उड्डाणपूल निर्मितीच्या प्रक्रियेमुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या धूलिकणांवर उपापयोजना म्हणून गिट्टीची मल्लमपट्टी लावण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ उड्डाणपूल निर्मितीच्या प्रक्रियेमुळे पर्यायी मार्गावर वाढलेल्या धूलिकणांवर उपापयोजना म्हणून गिट्टीची मल्लमपट्टी लावण्यात आली आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात धूलिणांपासून अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. या मार्गाचे लवकरच डांबरीकरण केले जाणार असल्याचे संकेत महापालिका प्रशासनाकडून मिळाले आहेत.
शहरात धूलिकणांचा वाढता प्रकोप अमरावतीकरांना श्वसन आजाराच्या विळख्यात ढकलत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात 'उड्डाणपुलाची डोकेदुखी' या वृत्तमालिकेतून ‘लोकमत’ने लोकदरबारी वृत्तांकन केले. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने उपाययोजनांसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिका प्रशासनाने राजापेठ उड्डाणपुलाजवळील पर्यायी मार्गावर गिट्टी टाकण्यास सुरुवात केली असून, एका मार्गाचे बहुतांश खड्डे बुजविले आहेत. दुसºया मार्गावरही गिट्टी टाकून खड्डे बुजविले जाणार आहेत. त्यानंतर पुढील उपाययोजनेत डांबरीकरणांचे काम सुरू केले जाण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच राजापेठ उड्डाणपुलाजवळील मार्गावरील धूलिकणांचा स्तर अत्यंत विरळ होणार असून, अमरावतीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ब्ल्यू प्रिन्ट तयार
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांच्या निर्देशाप्रमाणे पर्यावरण विभागाने ६ नोव्हेंबर रोजी बैठक बोलाविली आहे. या बैठकीत धूलिकणावरील उपाययोजनांवर विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी चर्चा करून तोडगा काढणार आहेत. यासंबंधाने नियोजनाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
धूलिकणांविषयी ६ नोव्हेंबरला बैठक बोलाविण्यात आहे. यासंबधाने अॅक्शन प्लॅन तयार असून, खड्डे बुजवून लवरकच डांबरीकरणाची कामे केली जाणार आहे.
- महेश देशमुख,
पर्यावरण सवंर्धन अधिकारी.
खड्डे बुजविण्यासाठी सर्वप्रथम गिट्टीचे पॅचेस टाकण्यात येत आहे. लेव्हल मिळाल्यानंतर डांबरीकरणाचेही काम सुरू होईल. पंधरा दिवसांत काम पूर्ण करणार आहे.
- जीवन सदार,
अतिरिक्त शहर अभियंता.