* बलराम गणेश मंडळाचा रक्तदान शिबिराचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 AM2021-09-18T04:13:44+5:302021-09-18T04:13:44+5:30
स्थानिक काठीपुरा येथे बलराम गणेश मंडळातर्फे दरवर्षीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प केला जातो. गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्तदान शिबिराचे ...
स्थानिक काठीपुरा येथे बलराम गणेश मंडळातर्फे दरवर्षीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा संकल्प केला जातो. गणेश मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले होते. दरवर्षीच्या रक्तदान शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहता यावर्षी शिबिरात रक्तत्यांचा संख्येत वाढ झाली असून, सर्व ठिकाणी जाणवत असलेला रक्तपेढ्यांमधील तुटवडा पाहता या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन शहराचे नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे व स्थानिक पत्रकार अशोक पिंजरकर, नागेश गोळे, मनोहर मुरकुटे, प्रवीण बोके, उमेश काकड, सागर साबळे, जयेंद्र गाडगे, रवींद्र वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती ठाणेदार दीपक वानखडे, अर्चनाताई पखान जिप अध्यक्ष महिला आघाडी भाजप नगरसेवक भूपेंद्र भेलांडे, मनोहर भावे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रविभाऊ कोकाटे, सचिन गावंडे, रमेशसा जायदे यांची होती.
शिबिरामध्ये ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात पुरुषासह महिलांनीसुद्धा हिरीरीने रक्तदान केले. विशेष गणपती मंडळामार्फत रक्तदान शिबिरासारखे सामाजिक कार्यक्रम राबविणारे तालुक्यातील हे एकमेव मंडळ असून, जनतेने दिलेले प्रशस्तीपत्र व जनतेने दिलेला प्रतिसाद खऱ्या अर्थाने आमचा उत्साह वाढवितो, असे मत यावेळी कार्यक्रमाचे आयोजक माजी बांधकाम सभापती सचिन जायदे यांनी व्यक्त केले. शिबिराकरिता बर्मा रक्तपेढी परतवाडा येथील चमूचे सहकार्य लाभले. शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रशस्तीपत्राचे वाटप केले गेले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सचिन जायदे, गौरव जायदे, तुषार बारड, नीलेश गिरी, गजानन बारड, शुभम पांढरे, हेमंत पांढरे, यश बारड, मयूर बऱ्हाणपूरे, अविनाश खलोकार, प्रतीक बारड, भूषण बारड, उमेश लावणकर, शुभम महाजन, सूरज बहिरे, आनंद पांढरे, दर्शन बऱ्हाणपुरे, वैभव शिंदी जामेकर, मनोज जायदे, ऋषभ हागोने आदींचे सहकार्य लाभले.